नवनिर्वाचित पोलीस निरीक्षकांचे मनसे कडून स्वागत…

⚡कुडाळ ता.२६-: कुडाळ पोलिस स्टेशन मध्ये आज नव्याने पोलिस निरीक्षक पदी रुजू झालेल्या श्रीमती.वृणाल मुल्ला यांचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून करण्यात आले.

तसेच सामाजिक व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.कुडाळ तालुक्या विषयी विविध चर्चा झाली.तसेच नेहमी चांगल्या गोष्टींना आणि सकारात्मक बाबींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार्य राहील अस आश्वासन श्री धीरज परब आणि सहकारी यांनी नवनियुक्त पोलिस निरीक्षक यांना दिले.

यावेळी सन्मा.माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब,माजी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,माजी जिल्हा सचिव बाळा पावसकर,माजी संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव,माजी तालुका अध्यक्ष सचिन सावंत,जगन्नाथ गावडे,प्रथमेश धुरी,अनिकेत ठाकूर,रोशन ठाकूर,सूरज नेरूरकर, नफिस शेख,समीर मुजावर,अनिस शाहा उपस्थित होते.

You cannot copy content of this page