राजश्री नाईक : मडुरा तिठा येथे गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
⚡बांदा ता.२६-: अर्धांगवायू तज्ज्ञ कै. डॉ. शंकर नाईक यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याचे डॉक्टरांचे कार्य कायम सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन, त्यांच्या पत्नी राजश्री नाईक यांनी केले.
मडुरा तिठा येथे कै. डॉ. शंकर नाईक यांच्या स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांना वह्या, छत्री, स्कुल बेग, कंपास, चप्पल आदी शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करुन दिले. यावेळी श्रीमती नाईक बोलत होत्या. पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, सामाजिक कार्यकर्ते भास्कर नाईक, विद्यार्थिनी वेदिका केणी, अनुष्का नाईक उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ यांनी केले तर आभार भास्कर नाईक यांनी मानले.
