Headlines

Global Maharashtra Breaking News

कारीवडे पेडवेवाडीत सुमो पलटी होऊन अपघात

सकाळची घटना: सात प्रवासी किरकोळ जखमी ⚡सावंतवाडी ता.१५-: चालकाचा ताबा सुटल्याने सुमो पलटवून अपघात झालाय हा अपघात आज सकाळी कारीवडे- पेडवेवाडी येथे घडला असून यात सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाने ब्रेक मारल्याने गाडी पलटी झाली. संबंधित कुटुंब एका साखरपुडा कार्यक्रमानिमित्त सावंतवाडीत आले. होते.

Read More

विरोधकांनाही सोबत घेऊन सिंधुदुर्गात राष्ट्रवादी मजबूत करणार…

अबिद नाईक:ज्यांच्यात क्रियाशिलताच नाही, त्यांच्याबाबत बोलणे योग्य नाही;नियुक्तीचा निर्णय सर्वसहमतीने ⚡कणकवली ता.१४-: विरोधकांनाही सोबत घेऊन सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठलेही गटातटाचे राजकारण होणार नाही.असे सांगतानाचराष्ट्रवादी पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल कुडाळ तटकरे यांनी माझी जिल्हाध्यक्षपदी व काका कुडाळकर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. हा नियुक्तीचा निर्णय सर्वसहमतीने…

Read More

उद्धव ठाकरे कणकवलीत देतील तो उमेदवार निवडून आणायचा…

आ.भास्कर जाधव:कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली 14 जुलै (प्रतिनिधी)- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आतापासून कामाला लागा.प्रत्येक शिवसेना पदाधिकाऱ्याने जबाबदारी वाटून घ्या. शिवसेना संघटना वाढीसाठी प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे. आणि संघटनेत शिस्त बाळगली पाहिजे. सर्वांनी एकदिलाने काम केल्यास…

Read More

शेर्लेत घरावर झाड कोसळून नुकसान

⚡बांदा ता.१४-: शेर्ले जाधववाडी येथील अंकुश वामन जाधव यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे फणसाचे झाड पडून नुकसान झाले. या दुर्घटनेत घराची कौले, वासे व अन्य सामानाची नासधूस झाली. शेर्ले तलाठी नेत्रा सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी करुन नुकसानीचा पंचनामा केला. यात जाधव यांचे १ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.    शेर्ले परिसराला गुरुवार रात्री…

Read More

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे तील विद्यार्थ्यांनी घेतला चंद्रयान -3 च्या प्रक्षेपणाचा अनुभव…

⚡कुडाळ ता.१४-: आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे तील विद्यार्थ्यांनी चंद्रयान 3 च्या प्रक्षेपणाचा अनुभव घेतला.विद्यार्थी या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हावेत म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत मोठया टीव्ही स्क्रीन वर हे प्रक्षेपण लाईव्ह दाखवण्यात आले. तसेच या विषयी अधिक माहिती देणारे व्हिडिओ दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनी हा भारतासाठी असलेला गौरव क्षण आनंदाने साजरा केला.विद्यार्थ्यांना अद्ययावत…

Read More

लायन्स क्लब ऑफ कुडाळचा उद्या पदग्रहण सोहळा

⚡कुडाळ ता.१४-:लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांचा वर्ष २०२३ चा पदग्रहण सोहळा उद्या, शनिवार सायंकाळी ६.३० वाजता महालक्ष्मी सभागृह येथे होणार आहे.      नूतन अध्यक्ष सीए जयंती कुलकर्णी, सचिव स्नेहा नाईक, खजिनदार आनंद बांदिवडेकर, झोन चेअरमन अँड. समीर कुळकर्णी यांच्यासह लायन्स टीम पदभार स्वीकारणार आहेत. वर्ष २०२३ चे पदाधिकारी उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सीए शैलेश मुंड्ये, सूरज…

Read More

रिक्त पदांबाबतचा निर्णय म्हणजे ‘पावळेचा पाणी पाष्टाक‘-एम.के.गावडे

⚡वेंगुर्ला ता.१४-: जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या होणा-या नुकसानीचा विचार करता हे टाळण्यासाठी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ही रिक्त पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एवढे बेरोजगार तरुण असताना अशा सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेणे म्हणजे शासन ‘पावळेचा पाणी पाष्टाक‘ करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे…

Read More

देवगड तालुका काँग्रेस कमिटी निरीक्षक पदी अरविंद मोंडकर

⚡मालवण ता.१४-: राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांची देवगड तालुका काँग्रेस कमिटी निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवगड तालुका काँग्रेस कमिटीच्या स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समित्या गावपातळीवर जाऊन बांधणी करण्याची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे. ओरोस येथे झालेल्या जिल्हा काँग्रेस च्या बैठकीत प्रदेश काँग्रेसचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी श्री. शशांक बावचकर यांच्या…

Read More

चिंदरमधील गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून आर्थिक मदतीचे वाटप

⚡मालवण ता.१४-: मालवण तालुक्यातील चिंदर गावातील गुरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याने सुमारे ४५ गुरांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण ३५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या सर्व शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी रोख स्वरूपात २ लाख रु. च्या आर्थिक मदतीचे आज वाटप करण्यात आले. चार दिवसापूर्वी पासून चिंदर…

Read More

उद्धव ठाकरे यांनी मला वाढदिवसाला पाठविले हीच संदेश पारकर यांची खरी ताकद भास्कर जाधव

भास्कर जाधव:संदेश पारकर यांच्यासाठी कुणीतरी त्‍याग केला असता तर निर्णय घेणे सोपे झाले असते ⚡कणकवली ता.१४-: संदेश पारकर यांना केवळ स्थानिक पातळीवरच लढायचे नाही तर महाराष्ट्रात बदल घडविण्यासाठीही काम करायचे आहे. निश्चितपणे पुढील काळात पक्षनेतृत्व तुम्हाला न्याय देईल. पक्षसंघटना वाढीबरोबरच जनतेच्या प्रश्नांसाठी असेच धैर्य आणि हिंमतीने काम करत रहा, आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत अशी…

Read More
You cannot copy content of this page