जिल्हा परिषद भरती प्रक्रिया:सर्वाधिक ग्रामसेवक पदांसाठी अर्ज
⚡ओरोस ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील 17 संवर्गाच्या 334 अधिकारी कर्मचारी भरती करता 16,287 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील 5520 उमेदवारानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देतील, तर उर्वरित सर्व उमेदवारांनी राज्यातील एकूण 45 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार असल्याची माहिती गुरुवारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली. या आकडेवारीवरून पर जिल्ह्यातील उमेदवारांनी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरती मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र समोर आले आहे.
या 17 संवर्गामध्ये 334 पदे भरली जाणार असून, यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक 1 पददासाठी 4:अर्ज. पुरुष आरोग्य सेवकांची 55 पदांसाठी 3001, महिला आरोग्य परिचारिकांची 121 पदांसाठी 832 अर्ज , औषध निर्माता 11 पदांसाठी 848 अर्ज , कंत्राटी ग्रामसेवकांची 45 पदांसाठी 4276 अर्ज , कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा व बांधकाम 29 पदांसाठी 1736 अर्ज ,कनिष्ठ अभियंता विद्युत दोन पदांसाठी 727 अर्ज, कनिष्ठ लेखा अधिकारी दोन पदांसाठी 32 अर्ज ,कनिष्ठ सहाय्यक लेखा चार पदांसाठी 274 अर्ज, तारतंत्री दोन पदांसाठी 249 अर्ज , मुख्य सेविका पर्यवेक्षक दोन पदासाठी 127 अर्ज, पशुधन पर्यवेक्षक 18 पदांसाठी 328 अर्ज , प्रयोगशाळा तंत्रज्ञ दोन पदांसाठी 359, वरिष्ठ सहाय्यक चार पदे, वरिष्ठ सहाय्यक लेखा सात पदे, विस्तार अधिकारी कृषी तीन पदासाठी 453 अर्ज , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 27 पदांसाठी 1393 उमेदवारांचे अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले आहेत. एवढ्या 334 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे व यासाठी 16287 उमेदवाराने अर्ज दाखल केले आहेत.
सिंदूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी 16,287 उमेदवारांनी हे अर्ज दाखल केले आहेत. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 45 परीक्षा केंद्रे असून, अहमदनगर(356 )अकोला (145)अमरावती (247) औरंगाबाद (807) बीड (383) भंडारा (36) बुलढाणा (70) चंद्रपूर (62) धुळे (156) गडचिरोली (34) गोंदिया (22) हिंगोली (37)जळगाव (142) जालना (101) कोल्हापूर (1707) लातूर (622) मुंबई (789) नागपूर (106) नांदेड (780) नंदुरबार (53) नाशिक(429) उस्मानाबाद (130) पालघर (44) परभणी (190) पुणे (1492) रायगड (49) रत्नागिरी (143)सांगली (424) सातारा (272), सिंधुदुर्ग (5520) सोलापूर (259) ठाणे (349) वर्धा (42) वाशिम (101)आणि यवतमाळ (148) एवढे उमेदवार महाराष्ट्रातील त्यातही जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत. सिंधुदुर्ग पाठोपाठ कोल्हापूर, पुणे औरंगाबाद लातूर नांदेड नागपूर नाशिक बीड रत्नागिरी व सोलापूर या जिल्ह्यातील उमेदवाराने हे मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.ऑनलाइन परीक्षा होणार असून परीक्षेच्या आधी आठ दिवस सात दिवस उमेदवारांना हॉल तिकीट उपलब्ध होईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यात परीक्षेचे ठिकाण वेळ व दिनांक नमूद असेल.
