गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर घरफोडी चोऱ्या यासारखे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या…

मनसेची मागणी: डीवायएसपी यांची भेट घेऊन वेधले लक्ष

सावंतवाडी ता.३१-:
गणेश चतुर्थी सणाच्या पार्शवंभूमीवर सणासुदीच्या काळात होणारे चोरी घरफोडी तालुक्यात वाहनांच्या होत असलेल्या चोऱ्या यासारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. चोरट्याकडून बंद घरांना लक्ष केले जाते त्यासाठी पोलिसांनी कारवाईचीं मोहीम हाती घ्यावी, अवैध धंद्यावर करडी नजर ठेवावी तसेच सातोळे बावळट दाणोली आंबोली मार्गे मोठ्या प्रमाणात गुरांची वाहतूक होत असल्याचे तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत या सर्व बाबींवर सातत्याने कारवाई करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी सौ संध्या गावडे यांच्याकडे केली. तसेच सावंतवाडी मनसेच्या वतीने नूतन डीवायएसपी सौ संध्या गावडे यांची भेट घेण्यात आली.
यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गावडे यांचे विविध विषयांवर लक्ष वेधण्यात आले वं चर्चा करण्यात आली. तालुक्यासह इतर भागात होत असलेल्या वाढत्या चोऱ्या त्याचप्रमाणे या अगोदर मंदिरांमध्ये झालेल्या चोऱ्यांचा अद्यापही तपास लागला नाही चोरटे मोकाट फिरत आहेत. सोनुर्ली माऊली देवस्थान, निरवडे सातपाटेकर देवस्थान तसेच विविध देवस्थान मध्ये झालेल्या फंडपेट्यांच्या चोऱ्या तसेच तालुक्यासहित शहरात महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे बऱ्याच ठिकाणी आढळले आहे ह्या संदर्भात उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. विदाऊट टी पी होत असलेली अवजड वाहतूक सह जुगार मटक्यासहित अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे अशा विविध बाबींवर कारवाई करण्याची मागणी डी वाय एस पी गावडे यांच्याकडे मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार मंदार नाईक प्रकाश साटेलकर निलेश देसाई नंदू परब विजय जांभळे स्वप्निल जाधव अभि पेंडणेकर सागर येडगे रमेश शेळके आदी उपस्थित होते
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर लक्झरी गाड्या सावंतवाडीतून जाव्यात यावरही लक्ष ठेवण्यात यावे जेणेकरून उतरल्यानंतर येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही भुर्दंड बसणार नाही याची काळजी प्रशासनाने घेऊन तशा सूचना द्याव्यात अशी मागणी मनसे कडून करण्यात आली.

You cannot copy content of this page