दाभोलीत मंजूर विविध विकासकामांची सचिन वालावलकर यांच्या हस्ते भूमिपूजन

⚡वेंगुर्ला ता.३१-: दाभोली येथे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सुमारे १४ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या दाभोली शाळा नं १ ते वेंगुर्ला हद्द रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (५ लाख), दाभोली शाळा नं १ ते राजापूरकरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (७ लाख), दाभोली ग्रामपंचायत विस्तारीकरण करणे (५ लाख), दाभोली येथे गिरोबा मंदिर ते बंदर रोड खडीकरण व डांबरीकरण करणे (७ लाख) या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दाभोली उपसरपंच फिन्सुअनिता फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ राऊळ, माजी ग्रामपंचायत सदस्य नरेश बोवलेकर यांच्यासहित स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
You cannot copy content of this page