पाकिस्तानचे गोडवे गायचे असतील तर येथून चालते व्हा:रज्जाक बटवाले

⚡कणकवली ता.३१-: पाकिस्तान हा देश आमचा शत्रू आहे. जर कुणाला पाकिस्तानचे गोडवे गायचे आहे व त्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करायचा असेल असेल त्यांनी आपलं सर्व काही ते उचलायच व आपलं नाव आमच्या देशातून काढून तिथेच कायमचं राहायला जावे.अशा लोकांनी येथे राहू नये.असा टोला नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी लगावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात सर्वधर्मसमभाव सलोख्याचे मिळून एकत्र वागत आहेत हिन्दु — मुस्लिम एकतेचे अनेक उदाहरणे आहेत तेव्हा ज्यांनी हि अशी घटना केली आहे त्याचा आम्ही निषेध करतो व त्यांच्यावर कडक कारवाई करावी व अशा घटना पुन्हा घडू नये व समाजात जे कोणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी
अशा लोकांमुळे संपूर्ण समाज बदनाम होतो. तेव्हा पोलिस खात्याने ताबडतोब चौकशी करून करून संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी केली आहे.

You cannot copy content of this page