Headlines

Global Maharashtra Breaking News

शहर विकास आराखडा मंजूर होवूनही प्रशासन अनभिज्ञ…

१५ दिवसांत नकाशा उपलब्ध करून नागरिकांच्या हरकती घ्या:अन्यथा काँग्रेस करणार आंदोलन. मालवण दी प्रतिनिधीमालवण शहर विकास आराखड्या बाबत पुढे कोणती कार्यवाही झाली याची विचारणा करण्यास आज राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुका शिष्टमंडळ मालवण नगरपालिकेत गेले असता विकास आराखडा नियोजन अधिकारी यांनी मालवण शहर विकास आराखडा मंजूर झाल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याशी फोन वर झालेल्या संभाषणात…

Read More

कुडाळ एमआयडीसीमधील परप्रांतीय कामगारांना मनसेकडून समज

कुडाळ, प्रतिनिधीपिंगुळी गोंधयाळेवाडीमध्ये रात्रीच्या सुमारास दारूच्या शोधात फिरणाऱ्या एमआयडीसीमधील परप्रांतीय कामगारांना मनसेचे माजी कुडाळ उप तालुकाध्यक्ष दीपक गावडे आणि जगन्नाथ गावडे यांनी रात्री ८ नंतर कंपनीच्या गेटच्या बाहेर कामाशिवाय न येण्याची सक्त ताकीद देत मालक आणि मुकादमानाही देखील निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांचे आधार कार्ड आणि फोटो कुडाळ पोलीस ठाण्यात…

Read More

समालोचक अशोक नाईक यांचा घोटगेवाडीत सन्मान

रणझुंझार क्रिकेट क्लबकडून सोहळ्याचे आयोजन.. ⚡दोडामार्ग,ता.२२-: सिंधुदुर्गच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानावरील बुलंद आवाज म्हणून ओळख असलेले शिरोडा येथील जेष्ठ समालोचक अशोक नाईक यांचा घोटगेवाडी येथे विशेष सन्मान करण्यात आला. रणझुंझार क्रिकेट क्लबने या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी स्वराज्य सरपंचसेवा संघाचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, कोकण विकास संस्थेचे समन्वयक हनुमान गवस, रणझुंझार क्रिकेट क्लबचे सदस्य…

Read More

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पद तात्काळ भरा…

अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन:मिलिंद सावंत यांनी निवेदनद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिला इशारा बांदा/प्रतिनिधीबांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पद तात्काळ भरावे अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे माजी बांदा विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांना निवेदन दिले आहे. यावेळी तालुका…

Read More

किशोर तावडे जिल्ह्याचे नविन जिल्हाधिकारी

के मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर आयुक्त पदी बदली ओरोस ताजिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची बदली कोल्हापूर आयुक्त पदावर झाली आहे. त्यांच्या जागी किशोर तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षेहून अधिक कालावधी मंजूलक्ष्मी जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होत्या. कोरोना काळात त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती.

Read More

पगारासाठी पुन्हा एकदा नगरपालिका कंत्राटी कामगाराचे उपोषण…

उपोषण सुरु असतांना एकाला चक्कर; उपजिल्हा रुग्णालयात उपचार हलविले ⚡सावंतवाडी.ता.२२: येथील पालिकेचे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. आठवडाभरात पगार देण्याचे आश्वासन देऊन सुद्धा पगार न मिळाल्याने आपण पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोपर्यंत पगार दिला जात नाही तोपर्यंत आम्हीकामावर हजर होणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.दरम्यान त्यातील…

Read More

पाडलोस व्हाट्सअप ग्रुप भविष्यात आदर्श ठरेल…

माजी नगरसेवक शैलेश परब : क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात यशस्वी वाटचाल ⚡बांदा ता.२२-: मुंबई-गोवा महामार्गावरील समस्या मांडणारे गीत भजनाच्या माध्यमातून समोर आले आहे. भजनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविल्या जातात. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारची स्पर्धा जिल्ह्यात आजपर्यंत झाली नाही. निवडून दिलेल्या रागातून गायन करणे खूप कठीण असते आणि हे पाऊल या ग्रुपने उचलले आहे….

Read More

खैरतोडीच्या गुन्ह्यात दोन फरार आरोपींना वनविभागाकडून अटक…

⚡सावंतवाडी ता.२२-: क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेल्या खैराची खोदून, तोड करत असलेल्या तीन आरोपींपैकी दोन फरार आरोपींना अटक करण्यात काल सायंकाळी वन विभागाला यश आले. याबाबत सविस्तर वृतांत असा की, दिनांक 18 ऑगस्ट रोजी वनरक्षक इन्सुलि संग्राम पाटील व वनरक्षक कोलगाव सागर भोजने यांनी क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात खैरतोड करीत असलेल्या तीन आरोपींवर…

Read More

वीज ग्राहकांना ताकद देण्यासाठी जिल्हा ग्राहक संघटना स्थापन…

संजय लाड:वीज ग्राहकांनी सहभागी होण्याचे केले आवाहन… ⚡सावंतवाडी ता.२२-; जिल्ह्यातील वीज वितरण सेवेची स्थिती पाहिल्यास नागरिकांना विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे;तरी या समस्यांच्या निवारणासाठी व वीज ग्राहकांच्या मागण्यांना ताकद देण्यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे.नागरिकांना वीजेबाबत उद्भवणाऱ्या समस्यांचे वेगाने व शाश्वत निरसन करणे हे या…

Read More

रिक्षा व्यावसायिक मंगेश कर्पे यांचे निधन…

आंबोली,ता.२२: येथील रिक्षा व्यावसायिक मंगेश उर्फ हर्षु अर्जुन कर्पे(वय ४८) याना रात्री हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. अचानक मृत्यू झाल्याने शोक व्यक्त होत आहे.हर्षु हे रिक्षा व्यावसायिक होते अत्यंत प्रामाणिक व्यक्ती होते.लोकांबाबत त्यांना जाण होती. शिवसेना (उद्धव ठाकरे)पक्षाचे गटप्रमुख होते. एक चांगले व्यक्ती अचानक जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.पच्छात आई,२ मुलगे,पत्नी,भाऊ असा परिवार आहे.

Read More
You cannot copy content of this page