सिंधुदुर्गचे सुपुत्र संदीप आकेरकर यांना कुंग फु कराटे स्पर्धेत सुवर्णपदक…

गोव्यात राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न:भारतमाता मित्रमंडळ, उत्कर्षनगर, पिंगुळी यांच्यातर्फे सत्कार सोहळा..

⚡कुडाळ ता.१३-: गोवा (म्हापसा- पर्वरी) येथे नुकत्याच पार पडलेल्या कुंग फु कराटे (मार्शल आर्ट) चॅम्पियन राज्यस्तरीय ट्रॉफी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र संदीप सत्यवान आकेरकर यांनी स्पर्धेच्या सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकाविले. संदीप यांचा
सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गोव्यात गौरव करण्यात आला. या स्पर्धेत गोवा, पुणे येथून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
संदीप आकेरकर हे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी उत्कर्षनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संदीप आकेरकर यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल शनिवारी भारतमाता मित्रमंडळ, उत्कर्षनगर, पिंगुळी यांच्यातर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन मंडळाच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी मंडळातर्फे संदीप आकेरकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सत्करप्रसंगी संदीप आकेरकर म्हणाले की, मागील तीन वर्षे या राज्यस्तरीय स्पर्धेत मी खेळत आहे. या स्पर्धेचे सलग तीन वर्षे मी अजिंक्यपद पटकाविले आहे. यामध्ये माझे मार्गदर्शक श्रीकांत कामत यांचे योगदान महत्वाचे आहे. मी माझे वय ४७ असताना सुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतला. मागील ६ वर्षे मी
कुंग फु कराटेचे शिक्षण घेत असून ब्लॅक बेल्टही उत्तीर्ण आहे.
ते पुढे म्हणाले की, आजच्या जगात कराटेचे शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. विशेष करून आजच्या महिला किंवा तरुणींनी ही कला आत्मसात करावी. ज्यामुळे मुली किंवा मुलींना समाजात वावरताना ज्या अडचणी येतात त्यांना सामोरे जाता येईल.
यावेळी सिद्धेश मोंडकर, योगेश कुंभार, विजय तुडयेकर, सनी गावडे, राजू पाटकर, सुनील गाळवणकर, प्रथमेश उपळेकर, अजिंक्य वेंगुर्लेकर, अनिकेत वेतुरेकर, सिद्धेश चव्हाण, सिद्धेश्वर नाईक, अमर अणसुरकर, समीर बांदेकर, सचिन आकेरकर, कुणाल कुडाळकर, प्रवीण कलांगण
हे मंडळाचे कार्यकर्ते तसेच पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष दीपक गावडे उपस्थित होते.

You cannot copy content of this page