सरमळे -दाभिल रस्त्याचे सुरु असलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे…

राकेश गावडे यांचा आरोप:कामाची तात्काळ कामाची चौकशी करा..

⚡बांदा ता.१३-: सरमळे -दाभिल रस्त्याचे सुरु असलेले डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट सुरु असून ठेकेदाराकडून फसवणूक सुरु असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश गावडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी स्थानिक ग्रामस्थानसह ठेकेदाराला जाब विचारला. मात्र ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती श्री गावडे यांनी दिली.

सरमळे दाभिल या रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाची मागणी होत होती. त्यानुसार निधी मंजूर होऊन या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र करण्यात येणारे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप श्री गावडे यांनी केला आहे. या कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page