⚡बांदा ता.१३-: अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावऱण असून बांदा येथिल दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे श्री हनुमान सेवक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. मंदिरात सकाळी श्री हनुमंताची पुजाअर्चा होईल.तसेच दुपारी प्राणप्रतिष्ठा मुहुर्ताच्या वेळी घंटानाद व श्रीरामनामाचा जयजयकार होईल.त्यानंतर आरती करुन प्रसाद वाटण्यात येईल.सायंकाळी श्री रामनामाचा जप होईल.६.३० वाजता आरती करण्यात येईल.यानिमित्त संपुर्ण बाजारपेठेत आकर्षक रोषणाई करुन दिवाळीच्या स्वरुपात हा उत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले.तसेच या श्री हनुमान मंदिराच्या जिर्णोध्दाराचा संकल्पही याच दिवशी घोषित करण्याचे बैठकीत निश्चित करण्य़ात आले. यावेळी सिद्धेश शिरोडकर, ज्ञानेश्वर येडवे,साई पावसकर,तेजस येडवे,बाबुराव धारगळकर,बाबल नार्वेकर,साईनाथ केसरकर ,साईनाथ तेली, प्रणव वाळके,अनंत गोवेकर,हनुमंत येडवे,कुशल आळवे,हर्षल बांदेकर,आशुतोष भांगले आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बांदा हनुमान मंदिरात 22 रोजी विविध कार्यक्रम…
