सफाई कामगारांना पगारापासून वंचित ठेवणाऱ्या त्या ठेकेदारावर प्रशासनाने कारवाई करावी..
अँड. परिमल नाईक:वेळ पडल्यास सनदी मार्गाने लढा; कामगारांची कुचेष्टा वेळीच थांबवा ⚡सावंतवाडी ता.२३-: नगरपरिषद सफाई कामगार पगारा पासुन वंचित राहणे ही बाब अतिशय गंभीर असून कामगारांच्या पाठीशी मी खंबीर पणे उभे राहणार आहे प्रसंगी सनदी मार्गाने आवाज उठविला जाईल. वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढू प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर आवश्यक कारवाई करावी व कामगारांची कुचेष्ठा वेळीच थांबवावी…
