साटेली- भेडशी चर्च ते शांतादुर्गा मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡दोडामार्ग, दि-१५:- गेले कित्येक दिवस प्रतीक्षेत असलेला साटेली- भेडशी चर्च ते शांतादुर्गा मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
साटेली- भेडशी चर्च ते शांतादुर्गा मंदिर हा रस्ता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्हा नियोजन मधुन मंजुर करण्यात आला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने ग्रामस्थां मधून समाधान व्यक्त करण्यात आले.

भूमिपूजना वेळी शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस,शिवसेना जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, साटेली- भेडशी सरपंच छाया धर्णे, उपसरपंच सुमत डिंगणेकर, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, संजय गवस, शाखा प्रमुख सत्यवान धर्णे, पांडूरंग धर्णे, मायकल लोबो, सफोरा शेख, अमर राणे, गणपत डिंगणेकर, ग्रा. प. सदस्य विष्णू सुतार, इसाक शेख, किरण तारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page