बांदा येथील अविष्कार तारकांचा 2024 कार्यक्रम उत्साहात संपन्न:क्रिएटिव्ह सखी यांचे होते आयोजन..
⚡बांदा ता.१५-: क्रिएटिव्ह सखी बांदा आयोजित ‘आविष्कार तारकांचा २०२४’ कार्यक्रमात सावंतवाडीच्या पूजा सावंत ‘स्वानंद सुंदरी’ स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख १० हजार रुपये व मानाचा क्राऊन देऊन गौरविण्यात आले. महिलांनी महिलांसाठी आयोजित या स्पर्धात्मक कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यातील स्पर्धक महिलांचा मोठा सहभाग होता.
‘आविष्कार तारकांचा २०२४’ या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी सिने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, सुप्रिया वळंजू, फोजीया खतीब, धनश्री धारगळकर, क्रिएटिव्ह सखीच्या अध्यक्ष अंकिता स्वार, अमिता स्वार, बांदा ग्रा. पं. सदस्या रुपाली शिरसाट आदी उपस्थित होते. यावेळी वैष्णवी कल्याणकर, श्वेता कोरगावकर, अमिता स्वार, अंकिता स्वार, माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, डेगवे सरपंच राजन देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वानंद सुंदरी स्पर्धेत प्रथम पूजा सावंत (सावंतवाडी), द्वितीय माधवी शहापूरकर (ओरोस), तृतीय श्रावणी बिपिन येडवे (बांदा), उत्तेजनार्थ नव्या फुलारी (दोडामार्ग) आणि गौतमी गोवेकर (बांदा).
क्रिएटिव्ह सखीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीनच सुरू केलेल्या मॉम अँड चाइल्ड स्पर्धेत प्रथम क्रमांक आरती परब व मुलगी युक्ता परब (पेडणे गोवा), द्वितीय क्रमांक पूजा पिंगुळकर आणि मुलगा शार्विल पिंगुळकर (कुडाळ), तृतीय क्रमांक नम्रता नेवगी व मुलगी सृष्टी नेवगी (सावंतवाडी) यांनी संपादन केला.
ग्रुप डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक रॉकस्टार ग्रुप (बांदा), द्वितीय क्रमांक प्रेरणा महिला मंडळ (बांदा), तृतीय क्रमांक विभागून दैवज्ञ महिला मंडळ आणि जोगवा ग्रुप (बांदा).
स्पर्धेचे परीक्षण मधुरा नाईक (दोडामार्ग), रिया कांबळे (गोवा), सोनाली पारकर (कणकवली) यांनी केले. कोरीओग्राफर म्हणून अनिकेत आसोलकर (सावंतवाडी), अभिजीत आणि खुशी यांनी काम केले. ग्रुप डान्स स्पर्धेचे परीक्षण दीपा कुबडे, अनिकेत आसोलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा अंकिता स्वार, रूपाली शिरसाट, रिया वाळके, वंदना पावसकर, साधना पांगम, सिद्धी पावसकर, सोनाली राणे, सावली कामत, उज्वला महाजन, निनता गोवेकर, अमिता स्वार, श्रेया गोवेकर, श्रुती गोवेकर, तनवी काणेकर, श्रुती वळजू, मृणाल तोरस्कर, वर्षा नाडकर्णी, सायली विरनोडकर, श्रुती शिरोडकर, प्रिया नाटेकर, चित्रा भिसे, माधुरी पावसकर, स्नेहा पावसकर, जयश्री गोवेकर, पल्लवी पावस्कर, सिंधिया पावस्कर, सपना विरनोडकर, रेश्मा राजगुरू यांनी मेहनत घेतली.
