प्रभाग क्र. ४ मधील मंजूर कामे लवकर सुरु करा…

राजू बेग: अन्यथा 26 जानेवारीला उपोषण; मुख्याधिकारी यांना निवेदनद्वारे इशारा..

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाड़ी नगरपरिषद प्रभाग क्र. ४ मधील मंजूर असलेल्या कामांची वर्क ऑर्डर येऊनही ठेकेदाराने कामे अद्याप सुरु केली नाहीत. ती लवकरात लवकर सुरु करा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात बेग यांनी म्हटले की, सावंतवाड़ी नगरपरिषद प्रभाग क्र. ४ मधील दत्तनगर कॉलनीमधील सामंत घर ते परूळेकर घर, झिरंगवाडीतील टेमकर घर स मोजेस घरापर्यंत गोवेकर कॉलनी, अभिषेक बावकर घराकडील रस्ता या चारही कामांची वर्क ऑर्डर ३० नोव्हेंबर रोजी देण्यात आलेली आहे. तरी अ‌द्यापपर्यंत मक्तेदारांनी ही कामे चालू न केल्याने या भागातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. संबंधित मक्तेदारांना त्वरीत कामे सुरु करण्याचे आदेश देण्यात यावेत. अन्यथा २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी या भागातील नागरिकांना घेऊन आपले लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला.

You cannot copy content of this page