Headlines

Global Maharashtra Breaking News

ओटवणे रवळनाथ मंदिरात उद्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.०२-: ओटवणे येथील रवळनाथ मंदिरात रविवारी ३ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत आणि माजगाव विभागीय शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ओटवणे गावात प्रथमच जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा होत असुन या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. भजन स्पर्धेचे उद्घाटन दुपारी १ :३०…

Read More

मिळून साऱ्याजणी महिला मंचचा श्रावणसरी कार्यक्रम ठरला रंगतदार

⚡कणकवली ता.०२-:मिळून साऱ्याजणी महिला मंचतर्फे श्रावणसरी कार्यक्रम कणकवलीत खऱ्या अर्थाने रंगतदार ठरला.फुगड्यांचे विविध प्रकार, उखाणे, हळदी कुंकू सोबतच श्रावण महिन्यातील सण समारंभाचे वैज्ञानिक महत्त्व डॉ. वर्षा करंबेळकर -सावंत यांनी अतिशय नेटकेप्रमाणे विशद केले. शिवशक्ती हॉल,कनक नगर कणकवली येथे श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी काही आरोग्य विषयक सल्ले सुद्धा अतिशय नेटकेपनाणे दिले. या कार्यक्रमांतर्गत महिलांची…

Read More

सरिता पवार यांच्या काव्यसंग्रहाला बुलढाणा जिल्ह्यातील काव्य गौरव पुरस्कार

⚡कणकवली ता.०२-: कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला बुलढाणा जिल्ह्यातील मानव बहु सामाजिक संस्था डोणगाव यांचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 सप्टेंबर रोजी डोणगाव येथे सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण केले जाणार असून रोख रक्कम स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील हा अत्यंत मानाचा पुरस्कार असून…

Read More

मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०२-: मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या संकल्पनेतून दि.२८ व २९ अॉगस्ट रोजी मिलाग्रीस हायस्कूल च्या पटांगणावर पावसाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे यांच्या हस्ते झाले.मुलांच्या अंगी खिलाडू वृत्ती विकसित व्हावी व त्यांनी खेळातील आपले कसब सिद्ध करावे हा या…

Read More

“ऊरी पाऊस दाटला” गाण्यांच्या अल्बमचे 3 सप्टेंबर रोजी प्रकाशन

⚡कणकवली ता.०२-: पाऊस ही प्रत्येकाच्या मनातील एक हळवी गोष्ट !!पडणारा पाऊस सगळीकडे पडत असला तरी सुद्धा पावसाची आपल्यानुसार वेगवेगळे रूप प्रत्येक जण अनुभव असतो. पाऊस संगीत देतो, आनंद देतो हीच प्रेरणा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत प्रेमीनी “ऊरी पाऊस दाटला” या गाण्यांच्या अल्बमचे आयोजन केले आहे. या अल्बमचे प्रकाशन रविवार 3 सप्टेंबर रोजी आचरेकर प्रतिष्ठान कणकवली…

Read More

मतांच्या राजकारणासाठी भाजपाने सिंधुदुर्गमध्ये केली उत्तर भारतीय मोर्चाची स्थापना…

परशूराम उपरकर:शिरकाव सर्वपक्षीयांनी विरोध करून मोडून काढावा कणकवली 2 सप्टेंबर (प्रतिनिधी)-जी मुंबई मराठी, कोकणी माणसांची होती ती अशाच प्रकारच्या राजकीय मतांच्या बेरजेत परप्रांतीयांच्या ताब्यात गेली आहे. आता तर भाजपाने सिंधुदुर्गमध्ये उत्तर भारतीय मोर्चाची स्थापना करून कोकणातही ही संघटना स्थापन केली आहे. सिंधुदुर्ग असेल किंवा कोकण हे कोकणी माणसांचे असून तेथे अशा प्रकारे मतांच्या राजकारणासाठी केला…

Read More

रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी ५ सप्टेंबर रोजी ‘रेल रोको’ आंदोलन

मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांचा निर्णय:सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन सादर.. ⚡बांदा ता.०२-: मडुरा रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशल गाड्यांना थांबा देण्यासंदर्भात कोरे प्रशासनाने अद्यापपर्यंत कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मंगळवार ५ सप्टेंबर रोजी रेल रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सादर केले.       मडुरा स्थानकावर…

Read More

सातोळी येथे गुरे वाहतूक करणारा ट्रक पकडला…

दोघांना घेतले ताब्यात:१६ गुरांची होत होती वाहतूक सावंतवाडी ता.०२-:येथील सातोळी तिठा येथे आजरा दिशेने जात असताना ट्रक संशयस्पद वाटल्याने थांबून चेक केले असता त्यात 16 गुरे असल्याचे आढळून आले. याप्रकरणी चालक इसाक अब्दुल्ल नेसरीकर वय 52, क्लीनर तौसीफ नेसरीकर वय 22 यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read More

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत: सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाच्या पाठीशी

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत: महायुतीचे सरकार मराठा आरक्षण दडपण्याचा प्रकार करत आहे ⚡कुडाळ ता.०२-: जालना अंतरवाली सराटी येथे मराठा समाजामार्फत मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने पुकारलेल्या मराठा आक्रोश आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचेच असताना आंदोलकांवर महायुती सरकार पुरस्कृत केलेला अमानुष आणि निंदनीय लाठीचार्ज हल्ला लांच्छनास्पद आहे,या निंदनीय घटनेला जबाबदार असलेले महायुती सरकार आणि गृहमंत्री…

Read More

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी मिळाला…

अमोल चौवरे रुजू: हेमंत मराठेंकडून स्वागत ⚡सावंतवाडी ता.०२-: मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अमोल चौवरे हे रुजू झाले असून त्यांचे मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी स्वागत केले आहे. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते मात्र यातील एक महिला वैदिकीय अधिकारी डॉक्टर अदिती ठाकूर या प्रसुती रजेवर गेल्या असून दुसऱ्या वैद्यकीय…

Read More
You cannot copy content of this page