⚡कुडाळ ता.२५-: भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ आणि मालवण येथील विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी विमानाने दाखल झाले आहेत. त्यांना उद्या, २६ जानेवारी होणाऱ्या राजपथ येथील मुख्य कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे.
या कार्यक्रमासाठी कुडाळ आणि मालवण तालुक्यातून एकूण दोन गटात २० जण गेले आहेत. यामध्ये जगदीश वालावलकर, विजय चव्हाण, परेश चव्हाण, मंगेश मेस्त्री, राजशेखर मेस्त्री, राधिका कोरगावकर, राजश्री नाईक, संजय मेस्त्री, चंद्रशेखर माळवे, संतोष सुतार, रवींद्र चव्हाण, सचिन साटेलकर, रुपेश पिंगुळकर, चेतन परब, आकाश पिंगुळकर, राजन नारींग्रेकर, सिद्धेश सरमळकर, सिद्धेश पिंगुळकर, चंद्रशेखर मेस्त्री, तन्वी परब यांचा समावेश आहे.
सिंधुदुर्गातील विश्वकर्मा योजना लाभार्थी दिल्लीत दाखल…
