जिल्हा क्रीडा विभागाचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ता २५
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२-२३ साठी सुधारित नियमावलीनुसार इक्वेस्टेरियन, गोल्फ, यार्टिंग, पावर लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, कॅरम, बिलियर्ड्स अँड स्नुकर, स्वाप्टबॉल( पुरुष), बेसबॉल (महिला), आणि जिम्नॅस्टिक या खेळासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत.
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, (उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) शिवछत्रपती राज्य पुरस्कार (साहसी उपक्रम )या पुरस्काराच्या नियमावलीत २९ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित नियमावलीनुसार पुरस्काराकरिता पात्र क्रीडा प्रकाराच्या यादीनुसार पुरस्कारांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यातील पात्र क्रीडा प्रकाराच्या यादीमध्ये शासनाने २५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार सुधारणा केली असून शासनाच्या २९ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णय सोबत आता रिक्वेस्टेरियन, गोल्फ, यार्टिंग,पावरलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, कॅरम, बिलियर्ड्स अँड स्नुकर, सॉप्टबॉल (पुरुष), बेसबॉल (महिला) या उपक्रमाचा विचार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२२- २३ मध्ये करण्यात शासनाने मान्यता दिली आहे. सुधारित शासन निर्णयातील तरतुदीनुसार रिक्वेस्टीरियन, गोल्फ, यार्टिंग, पावरलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, कॅरम, बिलियर्ड्स अँड स्नुकर, स्वाप्टबॉल (पुरुष), बेसबॉल (महिला) याच खेळांमधील खेळाडू व क्रीडा क्रीडा मार्गदर्शक यांनी त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावे. तसेच जिग्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारातील एरोबिक्स/अक्रोब्याटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू व मार्गदर्शक यांनी देखील ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे. पुरस्कारासाठी अर्जाचा नमुना उपलब्ध असून तो व्यवस्थितरित्या भरून क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे येथे २५ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनाचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे. असे सिंधुदुर्ग जिल्हा क्रीड़ा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
