वर्षा कुडाळकर:कर्ली नदीकिनारी अ अवैध वाळू उत्खननामुळे मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता…
⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ तालुक्यातील सोनवडे, सरंबळ, नेरूर येथील कर्ली नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू आहे. याबाबत या गावातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र, यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली नाही, अशी तक्रार निवेदनामार्फत शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल विभाग) कुडाळ यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सोनवडे येथील आर्या दुर्गा मंदिर हे कर्ली नदीकिनारी असून या अवैध वाळू उत्खननामुळे मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे येथील शेतकऱ्यांच्या बागायती शेतीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येथील नागरिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अवैध वाळू उत्खननावर त्वरित कारवाई करण्याची मागणी वर्षा कुडाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
