Headlines

Global Maharashtra Breaking News

ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचे चिरंजीव समर्थ गावडे याच दुःखद निधन…

सावंतवाडी : येथील जेष्ठ पत्रकार, कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेलचे संपादक, सकल मराठा व हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचा व्दितीय पुत्र समर्थ सीताराम गावडे (वय १६) याचे बुधवारी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. त्याच्या पश्चात आई संयुक्ता, वडील सीताराम, भाऊ साईश, बहिणी, काका, काकी असा मोठा परिवार आहे.समर्थ गेली पंधरा वर्षे मेंदु विकाराने…

Read Full News

खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुकमध्ये वृक्षारोपण..

खासदार नारायण राणे:प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे.. ⚡कणकवली ता.१६-: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रस्त्याच्या बाजूला विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी बोलताना…

Read Full News

सोनम वांगचुक यांच्या पाठिंबासाठी कणकवलीत लाक्षणिक उपोषण

कणकवली/ वार्ताहर शिक्षणाच्या विविध प्रश्नांसाठी लडाखचे पर्यावरणीय कार्यकर्ते व संशोधक सोनम वांगचुक यांनी दिल्लीत सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी कणकवलीत सांकेतिक उपवास करण्यात आला. वांगचूक यांच्या आंदोलनाला नैतिक बळ देण्यासाठी आणि आगामी २० जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या संसद मोर्चाला समर्थन देण्यासाठी ‘आम्ही भारतीय’ यांच्या वतीने कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण…

Read Full News

कणकवलीच्या विकासासाठी ११:४० कोटींचा निधी…

भव्य व्यापारी संकुलही उभारणार:नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡कणकवली ता.१६-: कणकवली शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल ११ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून अत्याधुनिक प्रसाधनगृह, प्रमुख चार रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच शहरात आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा आमचा संकल्प आहे. अशी माहिती कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर…

Read Full News

दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त २० जुलैला भव्य मोफत महाआरोग्य शिबिराची जयत तयारी…

उपजिल्हा रुग्णालयात नियोजन बैठक संपन्न १०० डॉक्टर, ३० तज्ज्ञांची उपस्थिती; पाच हजार रुग्ण तपासणीचे उद्दिष्ट.. ⚡सावंतवाडी, ता.१६-: माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त २० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. के.एल.ई. हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य…

Read Full News

कर्ले महाविद्यालयात करिअर संसदेचा शपथविधी सोहळा थाटात संपन्न…

मुख्यमंत्रीपदी सिद्धी सावळे तर कौशल्य विकास मंत्री म्हणून श्रध्दा जावकर.. ⚡देवगड ता.१६-: तालुक्यातील शिरगाव येथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागाच्या करिअर संसदेची १५ जुलै रोजी स्थापना करण्यात आली असून करिअर संसदेच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धी सावळे तर कौशल्य विकास मंत्री म्हणून श्रद्धा जावकर यांची निवड झाली आहे.महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण…

Read Full News

सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे सावंतवाडी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोमवार दि. 20/7/2026 रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर असून प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण(समीर) परीट फॉरेस्ट ऑफिसर, सौ दिपाली दिलीप भालेकर महिला बालकल्याण सभापती सावंतवाडी नगरपरिषद व सौ सुनीता होडावडेकर…

Read Full News

मालवणच्या भंडारी हायस्कुलमधीलमल्टी स्कील फाउंडेशन कोर्स विद्यार्थ्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम

उद्योजकता विकास केंद्राचे माजी उपसंचालक सुनील देसाई यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी आजचे जग झपाट्याने बदलत आहे, उद्याची नोकरी आज अस्तित्वात नसेल, त्यामुळे एकाच शिक्षणाबरोबर अनेक कौशल्ये (Multi skills) शिकणे ही काळाची गरज आहे, लहानपणी कुटूंबातील संस्कार आणि आजूबाजूचे वातावरण यातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय जे गुण आहेत त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. उद्योजक हा जन्मावा‌ लागत…

Read Full News

बांदा महसूल मंडळ कार्यालयातील अनियमित उपस्थितीवर ऋतिका नाईक आक्रमक…

तहसीलदारांकडे निवेदन; अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती व नागरिकांची कामे वेळेत करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा.. ⚡बांदा.ता.१५-: बांदा येथील महसूल मंडळ कार्यालयात मंडळ अधिकारी व कर्मचारी हे नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने महसूल विषयक कामे घेऊन येणाऱ्या जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्याची मागणी बांदा पंचायत समिती सदस्य सौ ऋतिका नाईक…

Read Full News

“विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित करून उद्योजक बनावे…

अमित पाटील:नोकऱ्या निर्माण करण्याचे स्वप्न पाहा”.. ⚡बांदा ता.१५-: भावी जीवनात विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता आपले कौशल्य विकसित करून उद्योजक बना आणि इतरांना नोकऱ्या तयार करून देण्याचे स्वप्न बघा असे प्रतिपादन बांदा केंद्रप्रमुख अमित पाटील यांनी येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.यावेळी व्यासपीठावर उद्योजक दिवाकर मावळणकर, उद्योजक शंकर…

Read Full News

You cannot copy content of this page