श्री भूमिका मायापूर्वचारी दशावतार नाट्यमंडळाचा नूतन नाट्यप्रयोग ‘वटसिद्ध नागनाथा तू उभारीले अनंता
सावंतवाडी : नारायण आसयेकर प्रस्तुत श्री भूमिका मायापूर्वचारी दशावतार नाट्यमंडळ, मळगाव यांच्यावतीने ‘वटसिद्ध नागनाथा तू उभारीले अनंता’ या नवीन ट्रिकसीनयुक्त पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग नाट्यप्रयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. अद्भुत दृश्ये आणि आकर्षक ट्रिकसीनच्या माध्यमातून हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.या नाट्यप्रयोगाची कथा व संकल्पना दशावतारी कलाकार नारायण आसयेकर यांची आहे. या नाट्य प्रयोगात स्वर्गातून…
