Headlines

Global Maharashtra Breaking News

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात टेलिकॉम सायबर अवेअरनेस कार्यक्रम संपन्न

मालवण : (प्रतिनिधी) मालवण येथील स.का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने टेलिकॉम सायबर अवेअरनेस कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहणे काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Read Full News

देवबाग येथील श्री देव विठ्ठल मंदिरात उद्या पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

मालवण दि (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील देवबाग येथील श्री देव विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी उद्या बुधवार, दि. २२ जुलै पासून २९ जुलै २०२६ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम, भजन सेवा, दिंड्या, दशावतार खेळ आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. बुधवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता…

Read Full News

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या पडझडीबाबत पुरातत्त्व विभाग व शासनाविरोधात मनसेची टीका…

⚡मालवण ता.२१-:छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ३५० वर्षांपूर्वी उभारलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आजही समुद्राच्या लाटांशी झुंज देत दिमाखात उभा आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती आणि काळाच्या ओघात किल्ल्याच्या तटबंदीची होत असलेली पडझड रोखण्यासाठी पुरातत्त्व विभाग व शासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी केला आहे. किल्ल्याच्या विविध भागांची यापूर्वीही…

Read Full News

संध्या तेरसे यांनी सोडले नगरसेवकपद

उपोषण, निवेदने… तरीही कारवाई नाही:नाईलाजास्तव जिल्हाधिकाऱ्यांकडे केला राजीनामा सुपूर्द.. कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कथित गैरकारभाराला विरोध करत तसेच प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक १२ (हिंदू कॉलनी)च्या नगरसेविका सौ. संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या…

Read Full News

पावशी-घावनळेफाटा अपघातप्रवण लेनवर अखेर प्रशासनाची कारवाई सुरू…

पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महामार्ग प्रशासनाला जाग; तात्पुरत्या उपाययोजनांना आजपासून सुरुवात.. ⚡कुडाळ ता.२१-: पावशी – घावनळेफाटा येथे बाॅक्सेलजवळील मुंबई गोवा महामार्गाच्या अपघात प्रवण लेनवर आजपासून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाकडून होती घेण्यात आले आहे. पावशीचे माजी सरपंच श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर महामार्ग प्रशासनाला जाग आली. त्या ठिकाणच्या लेनवर पावसाळ्यात…

Read Full News

आडेली खुटवळवाडी कार्यक्षेत्रात स्त्रीटलाईट्स बंदावस्थेत….

विविध समस्यामुळे होतोय आडेली गावच्या विकासावर परिणाम…. वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील आडेली या गावातील आडेली खुटवळवाडी कार्यक्षेत्रात असलेल्या स्ट्रीटलाईटस बंदावस्थेत असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी हा मुख्य मार्ग असूनही संबंधित विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. वारंवार बंद होणाऱ्या स्ट्रीटलाइट्स पूर्ववत सुरु करण्याकडे संबंधित प्रशासनाचे “वारंवार” दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या…

Read Full News

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा जाहीर पाठिंबा

मालवण (प्रतिनिधी) शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, भ्रष्टाचार तसेच विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने जाहीर पाठिंबा दर्शविला. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. सुकटे यांना संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) राज्य प्रतिनिधी अशोक गिते यांनी प्रत्यक्ष भेटून सादर…

Read Full News

सेवाकार्यातून लायन्स क्लब मालवणचे नाव उंचावणार..

अध्यक्ष सहदेव बापर्डेकर:लायन्स क्लब मालवणचा शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न.. ⚡मालवण ता.२०-:मालवण लायन्स क्लब गेली अनेक वर्षे सातत्याने सामाजिक सेवा कार्य करत आहे. आज माझ्यावर विश्वास दाखवून या क्लबच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. क्लबच्या सेवा कार्यात सर्वांच्या सहकार्याने मी आणखी भर घालीन, सेवाकार्यातून क्लबचे नाव उंचावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन लायन्स क्लब…

Read Full News

सावंतवाडीत चर्मकार समाजाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्नेहमेळावा थाटात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२०-: अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा डेटा गोळा करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले आहे. प्रसंगी मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन समाजाचे प्रतिनिधित्व करत समाज नेतृत्व जिवंत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, असे उद्गार सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आणि मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. अनिल…

Read Full News

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा…

रवींद्र खेबूडकर:सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा भव्य सत्कार.. ⚡कणकवली ता.२०-: विद्यार्थ्यांनी केवळ गुणांसाठी नव्हे तर ज्ञान, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून मोठी स्वप्ने पाहावीत. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देत असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read Full News

You cannot copy content of this page