Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी येथे श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२५-:गेली पाच वर्षे श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्था ही सातत्याने ‘ऑडिट अ’ वर्गामध्ये येत असून ठेवीदारांचा पतसंस्थेवर असणारा विश्वास कायम आहे. हा विश्वास पुढेही असाच कायम ठेवण्याच्या दृष्टीने पतसंस्थेने भावी पिढीच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्धार केला आहे. तसेच संचालक मंडळाच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचे कर्ज आम्ही देत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद बाळा…

Read Full News

विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेच्या विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी उत्साहात…

वैभववाडी प्रतिनिधीया विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला नामाच्या गजरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेतली विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने नावळे गावात भक्ती मळा फुलवला.आषाढी वारी निमित्ताने नारळे गावात विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेचे विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ यांनी विठुरायाच्या गजरात शाळा ते भगवती मंदिर अशी पारंपारिक वेशभूषा करून दिंडी काढण्यात आली या…

Read Full News

प्रतिपंढरीत आषाढी महाएकादशी उत्साहात; विठ्ठल नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमला…

सावंतवाडी : प्रतिपंढरी श्री देव विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी महाएकादशी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पहाटे दुग्धाभिषेक, काकड आरती, महापूजेनंतर भाविकांना विठ्ठल दर्शन खुले करण्यात आले. शेकडोंच्या संख्येने विठ्ठल भक्तांनी उपस्थित राहत श्रींचे दर्शन घेतले. पहाटे काकड आरती व महापूजा संपन्न झाली‌. पूजेचा मान शेखर धारगळकर व नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर यांना मिळाला. शेकडोंच्या संख्येने विठ्ठल भक्तांनी…

Read Full News

मनसे दोडामार्ग शाखेची बैठक उत्साहात; नवीन कार्यकारिणीबाबत चर्चा..

दोडामार्ग : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दोडामार्ग शाखेची बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत संघटन बळकटीकरण, आगामी उपक्रम, पक्षविस्तार तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून युवकांना संघटनेशी जोडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.बैठकीस श्री. विनायक कृष्णा सावंत, श्री. संदीप नामदेव गावडे, श्री. मधुसूदन (दादा) खांबल, श्री. पांडुरंग निरंजन जाधव, श्री. महेश भागोजी वरक,…

Read Full News

लोकसहभागातून असनिये शाळेला नवे किचन शेड…

ग्रामस्थांनी घालून दिला प्रशासनासमोर आदर्श.. ⚡बांदा ता.२५-:शासनाच्या मर्यादित आर्थिक मदतीची वाट न पाहता असनिये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने लोकसहभागाच्या बळावर सुमारे दोन लाख रुपये खर्चून नवीन किचन शेड उभारून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. वस्तुरूप देणगी, श्रमदान आणि आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या किचन शेडचे उद्घाटन शुक्रवारी शाळा…

Read Full News

​इन्सुली येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर उत्साहात संपन्न…

​आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद..​⚡बांदा ता.२५-:सावंतवाडीचे धडाडीचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या वतीने माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इन्सुली येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.​नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते….

Read Full News

आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद घारपी शाळेत आनंदवारी ठरली लक्षवेधी

वारीतून विद्यार्थ्यांनी दिला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ग्रामस्थांकडून चिमुकल्यांवर बक्षीसांचा वर्षाव बांदा (दि.२५/०७/२०२६)आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे आयोजित करण्यात आलेली विद्यार्थ्यांची आनंदवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. विठ्ठल-रुक्मिणी , विविध संतांची व वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी पारंपरिक दिंडीत सहभाग घेतला. यावेळी स्वप्नील संजय…

Read Full News

चेंदवण मध्ये लाभार्थ्यांची मोफत ई – केवायसी

कुडाळ : भाजपा अनु.जाती जिल्हा उपाध्यक्ष भूपेश बापू चेंदवणकर व भाजपा चेंदवण यांच्या विद्यमाने चेंदवण गावातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांची विनामुल्य ई-केवायसी चेंदवण ग्रामपंचायत हॉल या ठिकाणी शनिवारी सकाळी मोफत करण्यात आली. शिबिराचा ४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.यावेळी भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेर्गुलेकर, सरपंच वैभव चेंदवणकर, माजी सरपंच सौ.उत्तरा धुरी, उपसरपंच ऋषिकेश माधक, भुपेश…

Read Full News

चेंदवण ग्रामपंचायतीत संजय गांधी निराधार योजना लाभार्थी मेळावा

जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : तालुक्यातील चेंदवण ग्रामपंचायत येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजारी पुरुष व महिला यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमात…

Read Full News

कारिवडेचे दोन तरुण अग्नीवीर म्हणून नियुक्त…

आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात सत्कार… ⚡सावंतवाडी ता.२५-: कारिवडे गावातच बालपण व शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या गरीब कुटुंबातील प्रणव उमेश भालेकर (वय 20) व मंथन एकनाथ कांबळी (वय 20) या दोन्ही तरुणांची सैन्य दलात अग्नीवीर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचा सन्मान व गौरव आज आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात मित्र मंडळाच्या वतीने करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page