Headlines

Global Maharashtra Breaking News

अर्चना घारेंकडून नवागतांचे स्वागत…

⚡सावंतवाडी ता.१५-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महिला कोकण प्रदेशाध्यक्ष तथा अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे यांनी आजपासून शाळा सुरू झाल्यामुळे शाळेत प्रवेशित असलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत पूजा दळवी, राष्ट्रवादी युवतीच्या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सावली पाटकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अर्चना घारे म्हणाल्या शिक्षण हे व्यक्तीला जीवनात…

Read Full News

आपसात गटबाजी न करता लोकसभेतील पराभवाच्या चुका विधानसभेत टाळा…

विनायक राऊत:पराभव मागे टाकून “फिनिक्स” पक्षाप्रमाणे भरारी घ्या … कुडाळ : आपसात गटबाजी न करता लोकसभेतील पराभवाच्या चुका विधानसभेत टाळा .आणि पराभव मागे टाकून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्या असे प्रेरणादायी आवाहन शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात त्यांनी इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव…

Read Full News

वाडा घरफोडी प्रकरणी एकाला १९ पर्यंत पोलीस कोठडी…

देवगड (प्रतिनिधी)दि १४ जून २०२४ देवगड तालुक्यातील वाडा घरफोडी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी महेश गणपत आचरेकर व ४१ (मूळ राहणार वाडा आचरेकरवाडी -देवगड, सध्या राहणार हनुमान टेकडी हनुमान नगर भांडुप- मुंबई) येथून शुक्रवारी सायंकाळी देवगड पोलिसांनी ताब्यात घेत शनिवारी कणकवली न्यायालयात हजर केले. कणकवली न्यायालयाने संशयित आरोपीस बुधवार १९ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे….

Read Full News

बांद्यात योगोपचार शिबीराचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीप्रेरणा महिला मंडळ बांदा आणि पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे योगोपचार शिबिर सोमवार दिनांक १७ जून ते २१ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. आतंरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ ते ७.३० या वेळेत दररोज पाच दिवशीय शिबिर संपन्न होणार आहे.या शिबिरात सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन…

Read Full News

दीक्षित फाउंडेशन तर्फे पडेल व पुरळ येथे शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡देवगड ता.१५-: कै. नीळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ “दीक्षित फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा पडेल नं. १ व जि. प. प्राथमिक शाळा पुरळ कसबा या दोन शाळांमधील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पडेल येथे डॉ. आरोही ओंकार दीक्षित तर पुरळ येथे युवा आंबा बागायतदार श्रीनिवास मराठे यांच्या हस्ते या शैक्षणिक…

Read Full News

दत्त मंदिर विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत…

⚡वैभववाडी ता.१५-: वैभववाडी तालुक्यातील दत्त विद्या मंदिर वैभव नंबर एक प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा व प्रवेशोत्सव तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम गटशिक्षण अधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी केंद्रप्रमुख श्री जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके मुख्याध्यापिका दर्शना सावंत पालक संदीप शिंदे शिक्षक दिनकर केळकर मनीषा साठे अहिल्या लांडगे आधी…

Read Full News

ई डब्लू एस दाखल्यांसाठी मराठा आक्रमक…

सोमवारी समाजाच्यावतीने तहसिलदारांची घेणार भेट: सिताराम गावडे यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सकल मराठा समाजाच्या वतीने इ डब्ल्यू एस आरक्षण बाबतचे दाखले देण्यास सावंतवाडी तहसिलदार टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी ठीक सकाळी अकरा वाजता सावंतवाडी तहसिलदार कार्यालयावर सकल मराठा समाजाचे पदाधिकारी धडक देणार आहेत तरी ज्या पालकांना…

Read Full News

कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव जि. प. शाळा नं.६ मध्ये नवोगत मुलांना दिपाली भालेकर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके वाटप…

⚡सावंतवाडी ता.१४-: कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्शपुरस्कारप्राप्त जि. प. भटवाडी शाळा नं. ६ मध्ये आज दिनांक १५ जूनला शाळा सुरु झाल्या त्यावेळी नवोगत मुलांचे स्वागत व पाठ्यपुस्तके वितरण मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांनी मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व नवोगत मुलांचे स्वागत केले.यावेळी शाळेच्या अध्यक्षा श्रीम. अनिशा…

Read Full News

सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील मिलाग्रिस हायस्कूलच्या भव्य पटांगणावर नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विशेष परिपाठ तसेच प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेशोत्सवाच्या विशेष दिनाचे औचित्य साधून शाळेत नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदन्हा व प्रमुख अतिथी प्रा. रूपेश पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आणि प्रतिनिधिक स्वरूपात…

Read Full News

कलंबिस्त हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१५-: तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा प्रवेशोत्सव तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव श्री.चंद्रकांत राणे, कलंबिस्त सरपंच श्रीम. सपना सावंत,उपसरपंच श्री. सुरेश पास्ते, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.गजानन पास्ते,पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री.सुभाष राऊळ,माजी शिक्षकेतर कर्मचारी श्री.रामचंद्र सावंत, मुख्याध्यापक श्री.अभिजीत जाधव, पालक श्रीम….

Read Full News

You cannot copy content of this page