देवगड (प्रतिनिधी)दि १४ जून २०२४
देवगड तालुक्यातील वाडा घरफोडी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी महेश गणपत आचरेकर व ४१ (मूळ राहणार वाडा आचरेकरवाडी -देवगड, सध्या राहणार हनुमान टेकडी हनुमान नगर भांडुप- मुंबई) येथून शुक्रवारी सायंकाळी देवगड पोलिसांनी ताब्यात घेत शनिवारी कणकवली न्यायालयात हजर केले. कणकवली न्यायालयाने संशयित आरोपीस बुधवार १९ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपीच्या वतीने अँड कौस्तुभ मराठे यांनी युक्तिवाद केला .
यापूर्वी वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयित चोरट्यांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतले असून शुक्रवारी त्यांना देवगड पोलीस स्टेशनमध्ये हजर करून अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले दोन्ही संशयीतांना न्यायालयाने १९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रणव राजन नारिग्रेकर व हरीश दिलीप आचरेकर अशी या दोन संशयीतांची नावे आहेत. आता या चोरी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीसही भांडुप मधून ताब्यात घेतली आहे.तीन्ही संशयित आरोपीना स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखेच्या मदतीने ताब्यात घेण्यात देवगड पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या चोरी प्रकरणाचा उलघडा आता जलद गतीने होईल.