विनायक राऊत:पराभव मागे टाकून “फिनिक्स” पक्षाप्रमाणे भरारी घ्या …
कुडाळ : आपसात गटबाजी न करता लोकसभेतील पराभवाच्या चुका विधानसभेत टाळा .आणि पराभव मागे टाकून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्या असे प्रेरणादायी आवाहन शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात त्यांनी इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, संजय पडते, जान्हवी सावंत, अमित सामंत, इर्शाद शेख, विजय प्रभू, शिवाजी घोगळे, अमरसेन सावंत, संतोष शिरसाट, अक्षता खटावकर, बाळ कनयाळकर,मंदार शिरसाट, राजन नाईक, बबन बोभाटे, अजित परब, कृष्णा धुरी आदी उपस्थित होते.
इंडिया आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला आहे हे मान्य आहे. पण त्या प्रभावाच्या नैराश्येमध्ये अडकून न पडता फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे राखेतून गरुडझेप घेतो, आणि आपले यश संपादन करतो त्याप्रमाणे आपणासर्वांना सुद्धा या निवडणुकीच्या प्रभावाची खंत मनामध्ये न ठेवता भार्री घेऊया. पुढे जाण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. केवळ धनशक्तीमुळे पराभव झाला अशी कारणमीमांसा कोना कार्यकर्त्याने करू नका, केवळ पैसाच जर जिंकला असता तर ६ लाख मतदारांना सरासरी २ रुपयांप्रमाणे १२० कोटी हिशोब होतो. तेवढी मते मिल्ने आवश्यक होते पण केवळ ४८ हजारांचे लीड जिंकून आलेल्या खासदारांना मिळाले आहे. इंडिया आघाडीला जी मते मिळाली आहेत त्यात एका पैशाचाही वापर झालेला नाही. उलट निवडून आलेल्या खासदारांनी अविचार कोकणामध्ये रुजविला. हे कोकणाला साजेसे नाही. कोकण तो पचवू शकणार नाही. कोकण हा विचारवंत आणि निष्ठावंतांचा प्रांत आहे. काही वेळा एक पाऊल मागे घ्यावे लागते. पण एक पाऊल मागे घेतल्यानंतर पुढची गरुडझेप घेणायची ताकद तुम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे असली पाहिजे. ती ताकद तुमच्या मनामध्ये निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच भावनेने तुम्हा कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे असे श्री. राऊत म्हणाले.
श्री. राऊत पुढे म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला कोणत्याही परिस्थितीत बहुमत मिळवून द्यायचे हे संपूर्ण महाराष्ट्राने ठरविले आहे, चांद्या पासून बारामतीपर्यंत इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आले. पण कोकणातील येऊ शकले नाहीत. पण कोकण हा पराभवाचे दुःख करत राहणार प्रांत नाहीये. कोकण माझे काय चुकले याचे अवलोकन करेल. काय चूल आहे ते शोधून काढेल. पण निराश होऊन शरणागती पत्करणार कोकणी माणूस नाही. जी ४ लाख २ हजार मते मिळाली आहेत टी मेरीटवर मिळालेली मते आहेत, पैशाने विकत घेतलेली मते नाहीत. म्हणून १५० कोटी घालून सुद्धा ४८ हजाराचेच मताधिक्य मिळाल्याचा त्यांना पाश्चात्याप होत आहे. म्ह्णूनच त्यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीतून मागे पडले. असा टोला श्री. राऊत यांनी नारायण राणे याना लगावला. निवडणून आलेल्या खासदारांचे कुडाळला म्हणावे तसे स्वागत झाले नसल्याची टीका श्री. राऊत यांनी केली. मुलाच्या आणि जिल्हयध्यक्षांच्या नावाने लावलेले बॅनर सोडले तर गावागावात त्यांच्या विजयाचा जल्लोष झाला आहे का, असा प्रश्न श्री. राऊत आणि विचारला. मतदारांना आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे शल्य असल्याचे श्री. राऊत म्हणाले.
कोकण पदवीधर मतदार संघाबत देखील विनायक राऊत यांनी भाष्य केले. इंडिया आघाडीचे उमेदववर रमेश किर यांना पाठीशी संपूर्ण ताकद लावा असे आवाहन त्यांनी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना केले. इंडिया आघाडीचे उमेदवार प्रत्येक मतदारांकडे जाऊ शकत नाहीत. एवढ्या कमी दिवसात पाच जिल्हे आहेत, कितीतरी विधानसभा आहेत, त्यामुळे पदविधर मतदारांपर्यंत पोहोचण्याची जबाबदार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची आहे. त्यांना आमच्याकडून शंभर टक्के सहकार्य नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने तुम्हाला सहकार्य करून या इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे श्री. राऊत म्हणले. विनायक राऊत यांनी पत्रकारांचे देशील आभार मानले.
यावेळी नवनियुक्त शाखाप्रमुख, विभाग प्रमुख याना खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते नियुक्ती पात्र देण्यात आली. या संवाद यात्रेला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन बोभाटे यांनी केले.