अर्चना घारेंकडून नवागतांचे स्वागत…

⚡सावंतवाडी ता.१५-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महिला कोकण प्रदेशाध्यक्ष तथा अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे यांनी आजपासून शाळा सुरू झाल्यामुळे शाळेत प्रवेशित असलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी त्यांच्यासोबत पूजा दळवी, राष्ट्रवादी युवतीच्या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सावली पाटकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, अर्चना घारे म्हणाल्या शिक्षण हे व्यक्तीला जीवनात स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी व आपल्या आई-बाबांच्या स्वप्नांसाठी खूप शिकावे आणि मोठे व्हावे. कोकणातील मुलं ही नैसर्गिक कुशाग्र बुद्धिमत्तेची असून अलीकडच्या दहावी आणि बारावीच्या निकालात हे दिसून आले आहे, हीच गुणवत्ता उच्च शिक्षणातही असावी अशी अपेक्षा सौ. घारे यांनी यावेळी व्यक्त केले.

You cannot copy content of this page