बांदा/प्रतिनिधी
प्रेरणा महिला मंडळ बांदा आणि पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे योगोपचार शिबिर सोमवार दिनांक १७ जून ते २१ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. आतंरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ ते ७.३० या वेळेत दररोज पाच दिवशीय शिबिर संपन्न होणार आहे.
या शिबिरात सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत विशेष वर्ग होतील. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाईल. (कै.) माधव हरी अळवणी सभागृह मोर्येवाडी बांदा येथे सदर शिबिर होणार आहे.
तरी सर्व योगाभ्यास प्रेमी पुरुष, महिला तसेच लहान मुलांनी या योगशिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर (मो. 9823881712), संजय नाईक (मो. 9422379174), श्वेता कोरगावकर (मो. 9423320367), अंकिता चिंदरकर (मो. 9420277018) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
बांद्यात योगोपचार शिबीराचे आयोजन…
