⚡वैभववाडी ता.१५-: वैभववाडी तालुक्यातील दत्त विद्या मंदिर वैभव नंबर एक प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा व प्रवेशोत्सव तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम गटशिक्षण अधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी केंद्रप्रमुख श्री जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके मुख्याध्यापिका दर्शना सावंत पालक संदीप शिंदे शिक्षक दिनकर केळकर मनीषा साठे अहिल्या लांडगे आधी पालक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले.