Headlines

Global Maharashtra Breaking News

गांधीजींच्या विचारांचे आचरण हीच त्यांना खरी आदरांजली…

अनंत भाटे:नट वाचनालयात महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.. ⚡बांदा ता.०२-: महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाचा मार्ग दाखविला, तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला. या महापुरुषांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन अनंत भाटे…

Read Full News

गांधी चौक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी दर्पण आळवे…

⚡बांदा ता.०२-: गांधी चौक बांदा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी दर्पण आळवे, उपाध्यक्षपदी चेतन मुंगी, सचिवपदी ज्योतिनंद कुंभार, तर खजिनदारपदी धनेश नाटेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.आगामी ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष राकेश केसरकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन…

Read Full News

नट वाचनालयात खुली वाचक स्पर्धा

बांदा/प्रतिनिधीवाचनप्रेरणा दिनानिमित्त प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समस्त नेरुरकर परिवार पुरस्कृत खुल्या वाचक स्पर्धेचे आयोजन नट वाचनालयात गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आले आहे.ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांपुरती मर्यादित आहे. स्पर्धेसाठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर व व. पु. काळे यापैकी कोणत्याही एका साहित्यिकाच्या कोणत्याही पुस्तकावर परिक्षणात्मक बोलायचे…

Read Full News

‘रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ’ला ‘दि प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार…

बांदा/प्रतिनिधीसामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी आणि उत्कृष्ट उपक्रमांच्या माध्यमातून समाजात आशेचा किरण पसरवणाऱ्या ‘रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा’ या संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘आदर्श समाजसेवी संस्था’ अंतर्गत अत्यंत प्रतिष्ठेचा ‘दि प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा या क्लबला जाहीर…

Read Full News

बँकेने जप्त केलेले वाहन कमी किमतीत देण्याचे आमिष..

४.८० लाखांची फसवणूक:डोंबिवलीतून आरोपीला एलसीबीने ताब्यात घेतले;कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. ⚡कणकवली ता.०२-: बँकेने जप्त केलेली वाहने कमी किमतीत मिळवून देतो, असे सांगून फिर्यादीची तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मागील काही काळापासून पोलिसांच्या हाती न लागलेला आरोपी अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या हाती लागला. मंगेश राघोजी बागवे (वय ५२, रा….

Read Full News

पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तसेच सायंकाळी कणकवली येथे ओम गणेश बंगल्यावर जनतेच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधणार आहेत.

Read Full News

खांबाळे-दंड मार्गावरील धोकादायक झाडांची छाटणी; वाहतुकीचा अडथळा दूर…

वैभववाडी प्रतिनिधीफोंडा–वैभववाडी राज्य मार्गावरील खांबाळे-दंड परिसरात रस्त्यावर आडवी आलेली आंबा, वड यांसह मोठी झाडे व त्यांच्या फांद्या अखेर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत छाटण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर झाला असून वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.खांबाळे-दंड परिसरातून जाणाऱ्या राज्य मार्गावर काही मोठी झाडे रस्त्याच्या दिशेने वाढली होती. त्यातील फांद्या रस्त्यावर आडव्या आल्याने वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा…

Read Full News

पिंगुळीत वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीला वेग…

१० ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट:कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारण मोहीम तीव्र.. ⚡कुडाळ ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाणी साठवणूक आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. येत्या १०…

Read Full News

निराधारांचे हक्काचे घर असलेल्या संविता आश्रमाला प्रशासनाचे कायम सहकार्य…

जिल्हाधिकारी:पणदूर येथील संविता आश्रमाचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात.. ⚡कुडाळ ता ०२-: अनाथ, दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मायेची सावली देणाऱ्या पणदूर येथील संविता आश्रमाचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या आश्रमाच्या सेवाकार्याचे कौतुक करताना, निराधारांना आधार देणाऱ्या या संस्थेला जिल्हा प्रशासनाचे कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी तृप्ती…

Read Full News

गांधी जयंतीनिमित्त कुडाळमध्ये रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप

अनादि फाउंडेशन आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सेवाभावी उपक्रम:रुग्णांशी संवाद साधून जाणून घेतल्या समस्या.. ⚡कुडाळ ता.०२-: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अनादि फाउंडेशनच्या सह-संस्थापिका तथा काँग्रेस सदस्या प्रिती बांदेकर-शर्मा यांच्या सौजन्याने कुडाळ ग्रामीण रुग्णालय तसेच महिला व बालकल्याण विकास रुग्णालयातील रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांप्रती संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.यावेळी प्रिती…

Read Full News

You cannot copy content of this page