Headlines

Global Maharashtra Breaking News

क्षेत्रीय पेालिस अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक संपन्न…

निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका महतत्वपूर्ण:जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे.. सिंधुदुर्गनगरी दि 08 (जिमाका) निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यामधील दुवा म्हणून काम करावे असे जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी देखील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले

Read More

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार हा शिवसेनेचा द्यावा…

रुपेश पावसकर:किरण सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यात विविध कामे केली आहेत… ⚡कुडाळ ता.०८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार हा शिवसेनेचा द्यावा, अशी शिवसैनिकांची मागणी असल्याचे शिवसेनेचे रुपेश पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर …आदी उपस्थित होते.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा…

Read More

राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत गणेशकृपा संघ प्रथम…

गावडोबा कलेश्‍वर संघ द्वितीय, गजानन भजन मंडळ तृतीय ः कलाविष्कार ठरले लक्षवेधी.. ⚡कणकवली ता.०८-: कै. सुरेश धडाम यांच्या स्मृतिनिमित्त महापुरुष मित्रमंडळाने झेंडा चौकात आयोजित केलेल्या राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत विविध संघांनी सादर केलेले कलाविष्कार लक्षवेधी ठरले. या स्पर्धेत गणेशकृपा तेंडोली-कुडाळ संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गावडोबा कलेश्‍वर राईचीवाडी संघाने द्वितीय तर गजानन भजन मंडळ, नेरूर-कुडाळ संघाने…

Read More

वेंगुर्ले शहरात रंगात रंगले अबालवृद्ध…

रंगपंचमी उत्‍साहात: शिमगोत्सवाची सांगता.. ⚡वेंगुर्ले ता.०८-: वेंगुर्ले शहरात आज पंधरा दिवसांची रंगपंचमी उत्‍साहात साजरी करण्यात आली. सकाळ पासून अबालवृद्ध विविध रंगात रंगले होते. सायंकाळी उशिरा पर्यंत ही रंगपंचमी साजरी करत शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली.‘रंगात रंगू या सारे’ असे म्हणत वेंगुर्ले शहरात विविध रंगांची उधळण करीत आज रंगपंचमी उत्‍साहात साजरी करण्यात आली. या रंगपंचमीने येथील शिमगोत्सवाची…

Read More

मालवण मेढा येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.०८-: मालवण मेढा येथील श्री राम मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्त दि. ९ ते २३ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. ९ ते १६ एप्रिल या कालावधीत रोज सायंकाळी ७.३० वा. पालखी, दि. १२ रोजी सायंकाळी ६ ते ७ यावेळेत निवडक गीत रामायण (सुनील परुळेकर व…

Read More

ताज प्रकल्पात काहीजण आणत आहेत व्यत्यय…

मंत्री केसरकर यांच्या प्रयत्नाने प्रकल्प लागत आहे मार्गी:माजी आ शंकर कांबळी यांचा आरोप.. वेंगुर्ले (प्रतिनिधी)-गेली 26 वर्षे रखडलेला ताज हॉटेलचा प्रकल्प नामदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मार्गी लागत असून त्यामध्ये काही लोक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप भूमिपुत्र संघाचे सल्लागार माजी आमदार शंकर कांबळी यांनी व्यक्त केला आहे.दि. 4 एप्रिल पासून भूमिपुत्र संघाने…

Read More

माजगाव चीपटेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी यांनी केले कौतुक…

सावंतवाडी ता.०८-: ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मेडल धारक व उत्तीर्ण झालेल्या माजगाव चिपटेवाडी प्राथमिक शाळा नं ५ मधील विद्यार्थ्यांचे सावंतवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी कौतुक करून या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी माजगाव केंद्राचे केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत यांनीही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा पवित्रा…

Read More

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत इन्सुल्ली शाळा नंबर 5 चे घवघवीत यश…

बांदा/प्रतिनिधीगुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर मार्फत घेण्यात आलेल्या ‘गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा’ (G.T.S) मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ ने घवघवीत यश संपादन केले आहे. उमंग योगेश मुळीक इयत्ता पहिली हा विद्यार्थी ८८ गुण मिळवून राज्यात सातवा आला. देवांश दीपक पडवळ इयत्ता दुसरी हा ९० गुण मिळवून राज्यात पाचवा आला. पल्लवी प्रल्हाद सावंत इयत्ता…

Read More

आम्ही तुमचा बँडबाजा वाजविणारा…

ठाकरे शिवसेनेच्या खोबरेकर यांची निलेश राणेंवर टीका:मालवणात झालेली सभा नारायण राणेंच्या समारोपाची असल्याचीही केली टीका.. मालवण (प्रतिनिधी)-:मालवण येथे नारायण राणे यांची झालेली बैठक हि त्यांच्या समारोपाची बैठक होती. त्या बैठकीस फक्त राणे समर्थक उपस्थित होते, निष्ठावान भाजप कार्यकर्ते उपस्थित नव्हते. केवळ शिवसेना व ठाकरेंवर टीका करणाऱ्या राणे पिता पुत्रांनी ठाकरेंची काळजी करू नये. तसेच निलेश…

Read More

“संभ्रम” वेब सिरीज १० रोजी होणार प्रकाशित…

कारिवडे गावचे सागर गोसावी यांचा प्रयत्न: बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत पोस्टरचे अनावरण.. ⚡सावंतवाडी ता.०८-: कारिवडे गोसावी वाडी येथील सागर गोसावी दिग्दर्शित सात भागाची “संभ्रम” हा मराठी वेब सिरीज दहा एप्रिल रोजी प्रसारीत होणार आहे. त्याच्या पोस्टरचे अनावरण आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गरीब आणि ग्रामीण तरुणाच्या जीवनावर आधारित बनवण्यात आलेल्या या…

Read More
You cannot copy content of this page