⚡सावंतवाडी ता.०७-: सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नरेंद्र डोंगर येथे वन विभाग कर्मचारी ड्युटी बजावत असताना चौकीवर झाड कोसळून आत असलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.ही घटना दुपारी एकच्या दरम्यान घडली.
याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली आहे.
दरम्यान आपला सहकारी अशोक गावडे यांना फोन करून सदर घटनेची कल्पना दिली असता अशोक गावडे तेथे तात्काळ धाव घेत सावंत यांना चौकीमधून बाहेर काढले व आपला सहकारी उत्तम कदम यांच्या मदतीने सावंत यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयामध्ये दाखल केले . विद्याधर सावंत यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर कुटीर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या मदत कार्यासाठी सामाजिक बांधिलकी रवी जाधव यांचे सहकार्य लाभले.
