कट्टर राणे समर्थक संतोष गांवस यांच्याकडून मंत्री दिपक केसरकर यांचा सन्मान…

⚡सावंतवाडी ता.०७-: माजी मुख्यमंत्री, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा कट्टर राणे समर्थक संतोष गांवस यांच्याकडून सन्मान करण्यात आला. येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये हा सन्मान करण्यात आला.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अथक परिश्रम घेतले होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं मताधिक्य राणेंच्या विजयात निर्णायक ठरले होते. या विजयात सिहांचा वाटा उचलल्याबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा कट्टर राणे समर्थक संतोष गांवस यांच्याकडून सन्मान करत आभार व्यक्त करण्यात आले. श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात हा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सुधीर धुमे, साबाजी नार्वेकर, सचिन मळीक, आबा केसरकर, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page