नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांना विश्वास:कुडाळ लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात..
⚡कुडाळ ता.०७-: या वर्षात लायन्स क्लब कुडाळ सिंधुदुर्ग ही तुमच्या सर्वाच्या सहकार्याने अधिक चांगल्या प्रकारे कामगिरी करेल आणि समाजाला अधिक चांगल्या प्रकारे सेवा देईल असा विश्वास लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पूनाळेकर यांनी केले .शानदार सोहळ्यात कुडाळ लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण पार पडले
लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गच्या नूतन कार्यकारणीने शनिवारी सायंकाळी येथील महालक्ष्मी हॉल मध्ये झालेल्या शानदार पदग्रहण सोहळ्यात लायनिस्टिक वर्ष २०२४-२५ साठी जुन्या कार्यकारणीकडून सूत्रे हाती घेतली. नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सचिव आनंद बांदिवडेकर ,खजिनदार सुरज भोगटे, यांच्यासह नवीन सभासदांनी पदभार स्वीकारला. पीएमजेएफ लायन माजी प्रांतपाल सुनील सुतार कुरुंदवाड, लायन ऍड. विजय जमदग्नी कुरुंदवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
कुडाळ महालक्ष्मी हॉल मध्ये झालेल्या या सोहळयाचे उदघाटन लायन माजी प्रांतपाल सुनील सुतार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी लायन माजी प्रांतपाल सुनील सुतार कुरुंदवाड, लायन ऍड. विजय जमदग्नी कुरुंदवाड यांच्यासह मावळत्या अध्यक्ष सीए जयंती कुलकर्णी, सचिव स्नेहा नाईक, खजिनदार आनंद बांदिवडेकर, रिजन चेअरमन लायन गजानन नाईक, झोन चेअरमन लायन विश्वास गावकर, ऍड. समीर कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. विवेक पाटणकर आणि स्नेहांकिता माने यांनी ईशस्तवन आणि गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरेल सुरवात केली. लायन मिलिंद बोर्डवेकर यांनी सुनील सुतार यांची, लायन डॉ. सुशांता कुलकर्णी यांनी ऍड. विजय जमदग्नी यांची, लायन मंजुनाथ फडके यांनी गजानन नाईक यांची तर सीए शैलेश मुंडये यांनी विश्वास गावकर यांची ओळख करून दिली. मावळत्या सचिव स्नेहा नाईक यांनी सेक्रेटरी रिपोर्ट तर मावळते खंजिनदार आनंद बांदिवडेकर यांनी खजिनदार रिपोर्ट सादर केला.
नवीन कार्यकारिणीत सहभागी झालेल्या तहसीलदार वीरसिंग वसावे, राजन कोरगावकर, मंगेश तेंडोलकर, सचिन सावंत, साईश सामंत, पंकज देसाई आणि
नितीन दळवी याना इंडक्टिंग ऑफिसर लायन ऍड. विजय जमदग्नी यांनी शपथ दिली. त्यांनतर पदग्रहण अधिकारी प्रांतपाल लायन सुनील सुतार यांनी नवीन कार्यकारणीकडे पदभार सोपविला. यामध्ये अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, आइपीपी जयंती कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद बांदिवडेकर, जीवन बांदेकर, मंदार शिरसाट, सचिव आनंद बांदिवडेकर, सह सचिव कुणाल वरसकर, खजिनदार सुरज भोगटे, सह खजिनदार गणेश म्हाडदळकर, टेमर मंजुनाथ फडके, टेल ट्विस्टर चैतन्य तेरसे, पीआरओ सुधाकर कुलकर्णी, जीएसटी डॉ. अमोघ चुबे, जिएमटी सीए सागर तेली, जीएलटी वैभव सावंत, कॅम्पेन १०० ऍड. अजित भणगे, एलसीआयएफ चेअरपर्सन सुनेत्रा फाटक तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये सीए केशव फाटक, ऍड. अजित भणगे, सीए सुनील सौदागर, हेमंत कुडाळकर, मनोहर कामत, डॉ. विवेक पाटणकर, ऍड. अमोल सामंत, आर्किटेक्ट मंदार परुळेकर, ऍड श्रीनिवास नाईक, अनंत शिंदे, नयन भणगे, स्नेहांकिता माने, अस्मिता बांदेकर आणि डी दत्ताराम यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी एन व्ही विद्यालय पांग्रडच्या मुलांना स्कुल बॅग्स वितरित करण्यात आल्या. तसेच लायन्स कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात स्वरा रमाकांत कुलकर्णी अथर्व मिलिंद बोर्डवेकर, अर्पिता अमेय सामंत, श्रिया गुरव, शरयू अमोघ चुबे यांचा सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या ‘भेरा’ चित्रपटाच्या यशाबद्दल या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा खानोलकर आणि पटकथा लेखक प्रसाद खानोलकर यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी नवीन कार्यकारिणीच्या वतीने बोलताना नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांनी लायन्स क्लबच्या ध्येय आणि उद्दिष्टांना चालना देण्यासाठी आणि समाजासाठी उपयुक्त कार्य करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली. .येणाऱ्या वर्षात लायन्स क्लब कुडाळ सिंधुदुर्ग अधिक चांगल्या प्रकारे कामगिरी करेल आणि समाजाला अधिक चांगल्या प्रकारे सेवा देईल असा विश्वास व्यक्त केला. गजानन नाईक आणि विश्वास गावकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कुडाळ लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी. सावंतवाडी, मालवण आणि कणकवली लायन्स क्लबचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. त्या सर्वानी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीए जयंती कुलकर्णी तर आभार प्रदर्शन ऍड. समिर कुलकर्णी यांनी केले. संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन सीए सागर तेली व आनंद कर्पे यांनी केले.
