Global Maharashtra Breaking News

मालवण बंदर जेटी येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन…

⚡मालवण ता.१७-: शिवराजेश्वर मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी मालवण बंदर जेटी येथे शिवजयंती उत्सव साजरा होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिर ते मालवण बंदर जेटी शिवज्योत आगमन, सायंकाळी ४ वाजता दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शोभयात्रेला प्रारंभ…

Read More

पाडलोसमध्ये 19 रोजी ‘जल्लोष’ कार्यक्रम….

⚡बांदा ता.१७-: पाडलोस गाव व्हॉटस्अप ग्रुप आयोजित शिवजयंती निमित्त ‘जल्लोष 2024’ चे आयोजन दि. 19 फेब्रुवारी रोजी संध्या.7 वा. पाडलोस देव रवळनाथ मंदिर जवळ करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी 8.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. मुलांची भाषणे, महिलांचे कार्यक्रम, मिरवणूक आदी कार्यक्रम होणार. त्यानंदर दिवसभर विविध सांस्कृतिक…

Read More

मानसीश्वर जत्रौत्सवाला भाविकांची गर्दी…

⚡वेंगुर्ला ता.१७-: उभादांडा येथील मानसीश्वराचा जत्रौत्सव आज मोठ्या भक्तीमय वातावरणात बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत सुरु आहे. या जत्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस मंदिराच्या आजूबाजूला दुकानांसाठी छोटे-मोठे मंडप उभारुन विक्रेत्यांनी आपली जागा निश्चित केली होती. जत्रोत्सवाच्या आदल्यादिवशीपासून काही दुकाने सुरु झाल्याने याठिकाणी जत्रोत्सवाचा माहोल निर्माण झाला होता. आज शनिवारी पहाटेच जत्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मानाची निशाणे…

Read More

सावंतवाडी येथील सूर्यनमस्कार स्पर्धेत दुर्गा सरनाईक प्रथम…

घे भरारी फाउंडेशन तर्फे आयोजन: स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतावडी ता.१७-: जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून येथील भोसले उद्यान येथे घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेत दुर्गा गौतम सरनाईक यांनी 289 सूर्यनमस्कार घालून प्रथम क्रमांक पटकाविला. घे भरारी फाउंडेशन तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मीना विठ्ठल पिंगुळकर यांनी 235 सूर्यनमस्कार घालून द्वितीय तर सुप्रिया संजय…

Read More

रेडी येथील यशवंत गड येथे १९ रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१७सहदेव राऊळ-: रेडी येथील शिवप्रेमी यशवंतगड यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी यशवंतगड येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सकाळी ०७.३० वाजता श्री देवी माऊलीची ओटी भरून बाईक रॅलीने गडाकडे प्रस्थान, सकाळी ०८.०० वाजता शिरोडा बस स्थानक येथील शिवजयंती पुजन, सकाळी ०८.४५ वाजता रेडी ग्रामपंचायत येथून यशवंतगड येथे…

Read More

नरडवे श्री अंबाबाई मंदिरात 18 फेब्रुवारीपासून हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.१७-: नरडवे गावचे ग्रामदैवत श्री देवी अंबाबाई मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्ताने ग्रामस्थांकडून मंदिर आकर्षकरित्या सजविण्यात आले आहे. दक्षिणाभिमुख असलेले हे मंदिर म्हणजे देवीचे शक्तीपीठ मानले जाते. भारतातील निवड दक्षिणाभिमुख मंदिरांपैकी श्री अंबाबाई मंदिर एक आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री….

Read More

आचरा येथे १९ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा…

⚡मालवण ता.१७-: ठाकरे शिवसेना आचरा विभाग व सिंहगर्जना ग्रुपतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असून दि. १९ फेब्रुवारी रोजी आचरा तिठा येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त सकाळी १० वा. छत्रपत्नी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, ११ वा. स्थानिक मुलांचे पोवाडा गायन, सायंकाळी ४ वा. शिवचरित्रावर आधारित पथनाट्य, ४.३० वा. शिवचरित्रावर आधारित मालवण तालुका मर्यादित वेशभूषा…

Read More

मुंबईस्थित कुडाळ- मालवणवासीयांची २१ रोजी शिवसेना भवनात बैठक…

⚡मालवण ता.१७-: शिवसेना ठाकरे गटातर्फे कुडाळ-मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेले चाकरमानी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईत शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना उपनेते अरुण दूधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर व संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश पाटील, कुडाळ संपर्कप्रमुख…

Read More

मालवणात संत गुरु रविदास जयंती उत्सव साजरा…

⚡मालवण ता.१७-: मालवण सोमवार पेठ येथील संत गुरु रविदास नगर येथे संत गुरु रविदास जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे मालवण शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर यांच्यावतीने समाजातील पारंपारिक चर्म व्यवसाय करणाऱ्या रमेश पाडगावकर, गुरुनाथ चव्हाण, दत्तराम माणगावकर यांचा प्रतिमा व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संत गुरु रविदास…

Read More

मालवणात मिरची महोत्सवाला ग्राहकांचा प्रतिसाद…

⚡मालवण ता.१७-: मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि., मालवण संचलित मालवणी बझार मालवण चा मिरची महोत्सव आयोजित करण्यात आला असून २० फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. यामध्ये विविध प्रकारची मिरची उपलब्ध करण्यात आली असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या मिरची महोत्सवाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोहिते, संचालक शपी. एस. बागवे,…

Read More
You cannot copy content of this page