रेशनकार्ड धारकांना ऑफलाईन धान्य द्या, अन्यथा तहसीलदार कार्यालयाला घेराव घालणार…

सुशांत नाईक यांचा इशारा:सर्व्हर डाऊन नावाखाली कार्डधारकांना माराव्या लागत आहेत फेऱ्या..

कणकवली : रेशनकार्ड धारक जेव्हा रेशनधारक दुकानावर जातात तेव्हा त्यानां थम लावून ऑनलाईन प्रोसेस ने धान्य दिले जाते., पण आता कार्डधारक जेव्हा रेशन दुकानावर जातात तेव्हा सर्व्हर डाउन च्या अडथळ्यामुळे नागरिकांना पाठी पाठवून दिले जाते. सर्व सामान्य जनतेला याचा नाहक त्रास होत आहे. एका व्यक्तीला 4 ते 5 वेळा थम लावण्यासाठी जावे लागत आहे. तरी सुद्धा त्याला रेशन मिळत नाही. त्यामुळे त्यांना पाठी पाठवले जात आहे. नागरिकांना या येण्या जाण्याचा नाहक भुर्दंड पडत आहे. अश्या तक्रारी वारंवार मोठ्या प्रमाणात जनतेतून युवासेनेकडे येत असून यावर लवकरच उपाययोजना म्हणून जी ऑनलाईन प्रोसेस आहे ती ऑफलाईन पद्धतीने करावी यावर जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांनी लक्ष घालून तहसीलदारांना सूचना द्याव्यात की ऑनलाईन प्रोसेस ऑफलाईन करून नागरिकांच्या सह्या घेऊन त्यांना धान्य वितरित करावे.सर्व्हर चा जो दोष आहे त्यावर ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन धान्य देत जास्तीत जास्त लवकर जनतेला दिलासा द्यावा व सुरळीत धान्य पुरवठा करावा.आता महिना अखेर आल्याने नागरिकांना याची मुदत वाढ ही द्यावी. नागरिकांना होणारा त्रास युवासेना सहन करणार नाही, . जनतेला ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण न झाल्यास युवासेना प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाला ला घेरावा घालील असा इशारा युवासेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page