दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांचा इशारा;प्रशासनाला विचारणार जाब…
⚡दोडामार्ग ता.२८-: वाढीव वीज बिल, सतत खंडित होत असलेला वीज पुरवठा, ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीची कोलमडून गेलेली यंत्रणा, अपुरा कर्मचारी वर्ग तसेच, महालक्ष्मी वीजपुरवठा प्रामुख्याने या सर्व प्रश्नावर जाब विचारण्यासाठी सावंतवाडी विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने सोमवार दि. 29 जुलै रोजी कुडाळ येथील वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा दोडामर्ग तालुका प्रमुख संजय गवस यांनी दिला आहे..
गेल्या दीड दोन महिन्यात वीज वितरण कंपनीच्या कारभाराची जी केविलवाणी व्यवस्था झाली ती या अगोदर कधीच झाली नव्हती.. पावसाळ्यापूर्वी झाडे झुडपे तसेच विदयुत वाहिनी दुरूस्ती करण्यासाठी जी यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे होती.. ती आवश्यकता प्रमाणात न केल्यामुळे किंवा गाफील राहिल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना त्रास सहन करून, आर्थिक नुकसान ही झाले आहे.. विजेवर अवलंबून असलेले व्यापारी आज आर्थिक संकटात सापडले आहेत.. तसेच अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे.. यंत्रणा कुचकामी ठरत आहे.. दोडामार्ग तालुक्यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र गार झोपू गेले आहे.. अनेक महिन्यापासून कोनाळ येथील खाजगी विज पुरवठा करणारी महालक्ष्मी विदयुत कंपनीचा वीजपुरवठा तालुक्यात करावा अशी मागणी असताना, अद्यापही शासनाने याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल केल्या ची दिसत नाही.. या कंपनी व महाराष्ट्र शासनाचा करार संपवून एक वर्ष होत आले.. तरी शासनाला याबाबत देणे घेणे नसल्याचे दिसत आहे… तालुक्यातील जनतेला काळोखात ठेवण्याचा विडाच वीज वितरण कंपनी व शासनाने उचला का यांचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उबाठा पदाधिकारी कार्यकर्त वीजज वितरण कंपनी कुडाळ कार्यालयातील अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालणार आहेत..
