कणकवलीत २ ऑगस्ट रोजी संत नामदेव महाराज समाधी सोहळा…

⚡कणकवली ता.२८-: शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ, कणकवलीच्यावतीने २ ऑगस्ट रोजी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष सुहास वरुणकर यांच्या कणकवली, शिवाजीनगर येथील निवासस्थानी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास संघाचे उपाध्यक्ष अजित काकडे, खजिनदार किशोर शंकरदास, सहकार्यवाह ऋषिकेश कोरडे, कार्यवाह अभिजित मिरजकर, महिला मंडळ अध्यक्षा विनिता वरुणकर, उपाध्यक्षा माधवी काकडे, कार्यवाह पूजा शंकरदास, खजिनदार रश्मी महाडीक व कार्यकारी मंडळ सदस्य, महिला मंडळ व सल्लागार समिती आदी उपस्थित राहणार आहेत.

यादिवशी सकाळी १० वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, ११ वाजता शास्त्रीय व उपशास्त्रीय, भावगीत व भक्तीगीतांचा सुमधुर कार्यक्रम, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता गुणदर्शन कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता गुणगौरव व सत्कार समारंभ समारोप आदी कार्यक्रम होणार आहेत.

You cannot copy content of this page