प्रवासी सुविधेसाठी कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक बैठक लवकर लावा…

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने मंत्री केसरकर यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी…

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि येथील प्रवासी सुविधेसाठी आपल्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांसोवत तातडीची संयुक्त बैठक लावावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनत म्हटले की, सावंतवाडी स्थानकातील गैरसोयीबद्दल निवेदने आपणास वेळोवेळी दिलेली आहेत, प्रस्तावित्त टर्मिनस चे भूमिपूजन २७/०६/२०१५ रोजी मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मा. रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू, मा. पालकमंत्री श्री दिपक केसरकर, खासदार श्री विनायक राऊत, लोकप्रतिनिधी, व रेल्वे अधिकाऱ्यांचा उपस्थितीत पार पडलेले आहे. आणि याच्या पहिल्या टण्याचे उदघाटन देखील झाले आहे. याखेरीज या स्थानकाचे नामकरण कोकण रेल्वेचे शिल्पकार के प्रा मधु दंडवते यांचा नावे करण्यात यावे ही मागणी अजूनही अपूर्ण आहे.रखडलेले रेल्वे टर्मिनसचे उर्वरित काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, सावंतवाडी स्थानकचे नामकरण प्रा मधु दंडवते असे करण्यात यावे. कोकण रेल्वेच्या विकासासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यात यावे, कोरोना काळात ZBTT नुखार कोकण रेल्वे मार्गावरील काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे, सावंतवाडी स्थानकात खालील रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

You cannot copy content of this page