कामाला लागा,सावंतवाडी विधानसभा जिंकायची आहे…

जिल्हा प्रमुख बाबुराव धुरीं:नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचा सन्मानसह शेतकऱ्यांना रोपांचे वाटप करून उद्धव ठाकरेंचा वाढदिवस केला साजरा..

⚡सावंतवाडी ता.२७-: लोकसभेत झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत. याची दक्षता घेऊन आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघ जिंकायचा आहे. त्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे केले. 

दरम्यान आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता संघटना मजबूत करण्यासाठी तळागाळात जाऊन संघटनेचे विचार पोहोचवा आणि पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचा सन्मान आणि शेतकऱ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. धुरी बोलत होते. यावेळी विधानसभा मतदार संघप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, पंचायत समिती माजी सदस्य मायकल डिसोजा, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर,आबा सावंत,  युवा सेना तालुकाधिकारी कौस्तुभ गावडे, महिला तालुका संघटक भारती कासार, शहर प्रमुख श्रुतिका दळवी, कल्पना शिंदे, विनोद ठाकूर, मंथन गवस, शरद बांदेकर, प्रशांत बुगडे, मेघशाम काजरेकर, अशोक धुरी, दुलीप डिसोजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page