Headlines

Global Maharashtra Breaking News

आरटीओ समोर वाहन चालक संघटनानी केले आंदोलन …

माजी आ परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत केलेल्या आंदोलनात अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती.. सिंधुदुर्गनगरी ता ५लक्झरी बसमधून मालवाहतूक, गोवा बनावटीची दारू वाहतूक, अमली पदार्थ, सोने आणि गोमांस वाहतूक होत असल्याचा आरोप करत त्यावर कारवाई व्हावी. या मागणीसाठी आज माजी आ. परशुराम उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली वाहनचालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच आरटीओ यांना याबाबत जाब विचारला….

Read Full News

मुस्लिम समाजाचे सर्वेक्षण करा…

शरद पवार राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता ५महाराष्ट्रातील मुस्लिम समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम समाजाचे सर्वेक्षण करावे व मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत ८ टक्के आरक्षण द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)अल्पसंख्यांक विभाग सिंधुदुर्ग च्या वतीने शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन…

Read Full News

बांधकाम कामगारांना दाखला नाकारणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा…

अन्यथा 15 ऑगस्ट रोजी करणार आंदोलन:बांधकाम कामगार संघटनांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन.. ओरोस ता.०५-:ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णया अन्वये ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यास मनमानी पद्धतीने नकार देणाऱ्या मजूर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना घेऊन घंटा नाद…

Read Full News

जिल्ह्यात एक लाख 35 हजार 527 महिलांना लाडक्या बहिणीची मान्यता…

पडताळणी समितीने अर्ज केले मंजूरभाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती.. ओरोस ता.०५-: मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५० हजार ५६० अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील एक लाख ३५ हजार ५२७ अर्ज मंजूर करून अनुदान मिळण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. प्राप्त १०० टक्के अर्जांची छाननी करून अनुदानासाठी राज्य शासनाकडे…

Read Full News

प्राथमिक शिक्षक पतपेढीमध्ये झालेल्या घोटाळ्या बाबत सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा घ्या…

अन्यथा 10 ऑगस्ट रोजी सभासदांना घेऊन आंदोलन करणार:प्राथमिक शिक्षक संघाचा इशारा.. ओरोस ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेत केवळ वेंगुर्ला शाखेत भ्रष्टाचार झालेला नाही. तर जिल्ह्यातील सर्व शाखांत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सर्व शाखांच्या व्यवहाराची चौकशी व्हावी. तसेच संचालक मंडळाने तात्काळ विशेष सर्वसाधारण सभा लावावी. तशी मागणी करणारे ३००…

Read Full News

मालवण शहरातील विकासकामे अपूर्ण ठेवल्याच्या निषेधार्थ स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा…

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मात्र ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात नगरपलिका प्रशासनाला अपयश आले आहे. या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंदार केणी आणि यतीन खोत यांनी दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषणाचा…

Read Full News

आ.नितेश राणे खारेपाटण मध्ये जनतेच्या दारी…

जनतेशी थेट संवाद साधत समस्या घेतल्या जाणून:खारेपाटण येथे पार पडलेल्या जनसंपर्क मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. कणकवली : कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी आपल्या “तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी” या उपक्रमांतर्गत असणाऱ्या जनसंपर्क मोहिमे निम्मिताने खारेपाटण येथे गाव भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री कालभैरव मंदिर येथे आशीर्वाद घेत…

Read Full News

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे कॅरम स्पर्धेत यश…

मालवण (प्रतिनिधी) क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे रेकोबा हायस्कूल, वायरी येथे आयोजित १९ वर्षाखालील मुले कॅरम या क्रीडा प्रकारात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न  रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कु. अब्दुलवाजीब इस्माईल शेख याने तालुका स्तरावर सर्व प्रतिस्पर्धीना नमवून प्रथम क्रमांक पटकावला…

Read Full News

गावागावातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हे भाजपाचे व्हिजन…

विशाल परब:साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली भेट, लॅपटॉप, फ्लोमीटर सारखे आवश्यक साहित्यही केले प्रदान.. ⚡दोडामार्ग ता.०६-: जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम बनवण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न चालवले आहेत. दोडामार्गच्या आरोग्य यंत्रणेला सुसज्ज करण्यासाठी त्यांनी दिलेल्या निधीतून लवकरच इथली आरोग्य यंत्रणा कात टाकताना दिसेल. इथल्या नागरिकांना आजवर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले हे वास्तव आहे,…

Read Full News

आ नाईक यांनी कितीही प्रयत्न केला तरी दहीहंडी उत्सव आम्ही करणार…

निलेश राणे:आमच्यापेक्षा मोठा उत्सव करून दाखविण्याचे आ नाईक यांना दिले आवाहन.. ओरोस ता ५-:कितीही प्रयत्न आमदार वैभव नाईक यांनी आमच्या दहीहंडी उत्सवाला अडचण आणण्याचा केला तरी देखील आम्ही मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव यावर्षी देखील साजरा करणार आहोत. अडचण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैभव नाईक यांनी आमच्या पेक्षा मोठा दहीहंडी उत्सव घेऊन दाखवावा. जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना…

Read Full News

You cannot copy content of this page