अन्यथा 15 ऑगस्ट रोजी करणार आंदोलन:बांधकाम कामगार संघटनांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन..
ओरोस ता.०५-:ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णया अन्वये ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यास मनमानी पद्धतीने नकार देणाऱ्या मजूर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना घेऊन घंटा नाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी स्वाभिमानी कामगार संघ अध्यक्ष प्रसाद गावडे, निवारा कामगार संघ अध्यक्ष मंगेश चव्हाण, रत्न सिंधू बांधकाम कामगार अध्यक्ष अशोक बोवलेकर, श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण आदी उपस्थित होते.
