रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे कॅरम स्पर्धेत यश…

मालवण (प्रतिनिधी)

क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे रेकोबा हायस्कूल, वायरी येथे आयोजित १९ वर्षाखालील मुले कॅरम या क्रीडा प्रकारात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न  रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कु. अब्दुलवाजीब इस्माईल शेख याने तालुका स्तरावर सर्व प्रतिस्पर्धीना नमवून प्रथम क्रमांक पटकावला तर १९ वर्षाखालील मुलींमध्ये कु. रुपाली अविनाश कांबळी ही उपविजेती होऊन तिला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले तर कु.दीक्षा दीपक सुर्वे हिने पाचवा क्रमांक प्राप्त केला. या तिन्ही विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक प्रा.हसन खान व कु. करुण खोर्जे यांचे लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page