१५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ‘उद्योजक विचार मंच’ स्थापन करण्याचा प्रस्ताव…
ओरोस ता ६प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘उद्योजक विचार मंच केंद्र’ स्थापन करून गावातील उद्योगक्षमतेला एकत्रित दिशा देण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत उद्योजक विचार मंचाचा विषय अजेंड्यावर ठेवून त्यावर चर्चा केली जाणार आहे….
