Global Maharashtra Breaking News

देवगड जामसंडे न.प.करीता आम.,नितेश राणे यांच्या प्रयत्नाने २० कोटी ७३ लाखाचा निधी प्राप्त…

देवगड ता.१२-:देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमध्ये २० कोटी ७२ लाख रुपयांचा विकास कामांकरिता आवश्यक असणाऱ्या निधी आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने प्राप्त झाला असून याकरिता केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ,पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांचे विशेष आभार भाजप नगरसेवक नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहेत. या…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाला येणार नवी झळाळी…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण , ना. नारायण राणे यांच्या माध्यमातून २३ कोटी ७८ लाख मंजुर ; कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या पाठपुराव्याला यश.. ⚡कणकवली ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय (प्रशासकीय इमारतींचे) च्या दुरुस्तीबाबतचे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये गेल्या ३ वर्षातील झालेली कामे वगळून नवीन दुरुस्तीसाठी २३ कोटी ७८ लाख १७ हजार रुपये निधी मंजुर केला…

Read More

कलमठ ग्रामपंचायतीला मिळालं आयएसओ मानांकन…

गावाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा ; सरपंच संदीप मेस्त्री यांच्या कर्त्तूत्वाची दखल.. ⚡कणकवली ता.१२-: कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. कलमठ ग्रामपंचायत कार्यालयात आयएसओ मानांकन प्रमाणपत्र संस्थेचे सहदेव चव्हाण यांच्या हस्ते कलमठ ग्रामपंचायत सरपंच संदीप मेस्त्री यांना प्रदान करण्यात आले. गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कलमठ गावचे सरपंच संदीप मेस्त्री…

Read More

पाच हजार आठशे पन्नास लाभार्थ्यांना सिंदूर रत्न योजनेमधून लाभ…

मंत्री दीपक केसरकर: टीका करणारे टीका करत राहतात,आपण कामाला महत्त्व द्यायचं.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुरत्न समृद्ध योजनेचा लाभ आजपासून तुम्हाला मिळणार आहे. त्यांची सबसिडी देखील मिळणार आहे‌. जवळपास पाच हजार आठशे पन्नास लाभार्थ्यांना या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे‌. प्रशिक्षण घेतलेल्यांना सामुग्री उपलब्ध करून देण्यात आल्यान आता उत्पन्न सुरु होणार आहे‌, अशी माहिती शालेय शिक्षण…

Read More

लोकसभा विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी युवा मोर्चाने सज्ज व्हावे…

डाॅ.अमेय देसाई:भाजपा युवा मोर्चा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी प्रणव वायंगणकर यांच्या निवडीबद्दल सत्कार… ⚡वेंगुर्ला ता.१२-: भारतीय जनता पार्टीचे आपण सर्व कार्यकर्ते नशीबवान आहोत . आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा विश्वविख्यात लोकप्रिय नेता लाभला आहे . तसेच आपल्याला पक्षाचे मजबूत संघटन लाभले आहे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे पक्षासाठी चांगल्या वाईट दोन्ही काळात तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची…

Read More

कणकवली नगरपंचायत येथील कामगारांसाठी गृहोपयोगी भांडी संच वाटप केंद्र बंद ठेवल्याने कामगार संतप्त…

शेकडो कामगारांची कणकवली नगरपंचायत परिसरात गर्दी ; भांडी वाटप करणा-या कंपनीच्या स्टॉक मध्ये ठणठणाट.. ⚡कणकवली ता.१२-: महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम महामंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांसाठी गृहोपयोगी भांडी संच वाटप सुरु केले आहे. जिल्ह्यातील ९ हजार नोंदणीकृत कामगारांना शासनाने नियुक्त केलेल्या मोपतलाल एजन्सी मार्फत जिल्ह्यातील कुडाळ , कणकवली , मालवण , सावंतवाडी , देवगड या ५ तालुक्यांमध्ये वाटप सुरु…

Read More

रोणापाल येथे वेद व्यासांच्या इतिहासावर चित्रप्रदर्शन…

31 मार्च पर्यंत असणार सुरू : प्रत्येक चित्रावर कॅलिग्राफ केलेले मूळ संस्कृत श्लोक.. ⚡बांदा ता.१२-:प्रदर्शन हा कला आणि कलाकारांना ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एक भाग आहे. 2020 पासून रोणापाल येथे रेड हाऊस आर्ट एक्स्चेंज शेतकरी समुदायासोबत काम करत आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्गातील महिला शेतकऱ्यांना कलेची आणि विविध कला पद्धतींची ओळख करून देण्यासाठी कलाकार शिवानी अत्री यांचे चित्र…

Read More

आरोग्य विषयक उपक्रम कौतुकास्पद…

लखम सावंत भोसले:मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.१२-: संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे शाश्वत उपचार आहेत. त्यामुळे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आयुर्वेदाचे तज्ञ डॉक्टर घडविण्यासह आयुर्वेदाचा प्रसार व प्रचारासह राबवित असलेले आरोग्य विषयक उपक्रम कौतुकास्पद आहेत. असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थांनचे युवराज श्रीमंत लखम सावंत भोसले यांनी केले. गोवा…

Read More

अर्थसंकल्पात काजूला स्थान नसताना मंत्री दीपक केसरकरांनी केली काजू बागायतारांची फसवणूक…

जयेंद्र परुळेकर यांचा आरोप:चष्मा कारखाना, सावंतवाडी टर्मिनस, सेटॉफ बॉक्स, मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल आहे कुठे..? ⚡सावंतवाडी ता.१२-: आपला कोंकणातील काजू चविष्ट आहे. मात्र, यावर केंद्रातील मोदी सरकारनं नियोजनबद्ध संकट आणलं आहे. लाखो टन काजू आयात केल्यान स्थानिक काजू शेतकऱ्यांवर संकटं कोसळलं. १६० रू ओल्या काजूला एकेकाळी दर होता. पण, आज घाट्याचा धंदा करावा लागत आहे. आयात दर…

Read More

धाकोरे -मातोंड येथील काजू बागायतीला आग…

रात्री दहाच्या सुमारास घडली घटना:काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान… ⚡बांदा ता.१२-: धाकोरे – जोसोली – मातोंड येथील माळरानावर अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना रात्री साडे दहाच्या सुमारास विद्युत प्रवाह स्पार्किंग होऊन आग लागल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान आग लागल्याचे कळताच, धाकोरे वसवाचे तळे तसेच जोसोली येथील ग्रामस्थांनी तत्काळ तेथे…

Read More
You cannot copy content of this page