सावंतवाडी ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गतर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले.
१४ वर्षे वयोगट मुले यामध्ये स्मित सावंत हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर १४ वर्षे वयोगट मुलीँमध्ये सौम्य हरमलकर हिने तृतीय क्रमांक संपादित केला. १७ वर्षे वयोगट मुलांमध्ये भूषण मडगावकर यांने तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे सदस्य, क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या कार्वे तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर, क्रीडा शिक्षक भुषण परब, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कॅरम स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची विभागस्तरावर झेप…
