शारदा विद्यालय मळगाव शाळेचे गुरुनाथ गावकर यांनी केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.३१-: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मळगाव येथील जिल्हा परिषद शाळा शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेने तृतीय क्रमांक प्राप्त केला. शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे ग्रामपंचायत स्वच्छता अभियान समितीचे माजी अध्यक्ष गुरुनाथ गावकर यांनी पुष्पागुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, वर्षा गवस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page