Global Maharashtra Breaking News

परिपूर्ण कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या सेवेच्या प्रतीक्षेत…

गणेश पेडणेकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू.. सिंधुदुर्गनगरी ता १३कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत बांधून तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी सदर इमारतीचे उद्घाटन न झाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी कासार्डे येथील गणेश तुकाराम पेडणेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे…

Read More

मनसेचे विद्यार्थी संघटक यश सरदेसाई उद्या सावंतवाडीत…

⚡सावंतवाडी,ता.१३: मनसेचे विद्यार्थी सेना संघटक यश सरदेसाई व राज्य संघटक प्रशांत कनोजिया उद्या सावंतवाडीत येणार असून यावेळी सकाळी १० वाजता मँगो १ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केले आहे.

Read More

मनसेच्या नूतन मालवण शाखेचे उद्या उदघाटन…

⚡मालवण ता.१३-: मालवण भरड येथील हॉटेल प्राईड नजीक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नूतन शाखेचे उदघाटन १४ मार्च रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षनिरीक्षक संदीप दळवी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असल्याचे मनसे महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस यांनी जाहीर केल्याची माहिती मनसेचे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिली आहे. या…

Read More

आंबेरी येथे १५ रोजी इंडेन गॅस धारकांसाठी ई केवायसी शिबीर…

⚡मालवण ता.१३-: इंडेन गॅस ग्राहकांनी ई केवायसी करणे गरजेचे आणि बंधनकारक आहे. मात्र यासाठी गावातील गॅस धारकांना मालवण येथे यावे लागणार असल्याने परंतु गॅस ग्राहकांचा वेळ आणि पैशाची बचत व्हावी या दृष्टीने सिंधू सहकारी इंडेन गॅस, मालवण आणि आंबेरी सरपंच यांनी केलेल्या मागणी नुसार आंबेरी ग्रामपंचायत येथे शुक्रवार दि. १५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजल्या…

Read More

नुतन साहाय्यक गटविकास अधिकारी आर डी जंगले यांचे काँग्रेसकडून स्वागत…

⚡वैभववाडी ता.१३-: वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे वतीने वैभववाडी पंचायत समितीचे नुतन साहाय्यक गटविकास अधिकारी आर डी जंगले यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काॅग्रेसचे सचिव माजी सभापती मीनाताई बोडके, तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, दिलीप नारकर,भारती कुडतरकर,श्रेया मुद्रस, दस्तगीर नाचणे आदी कॉग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

प्रेरणा महिला मंडळाच्या महिलांनी यावर्षीचा महिला दिन एका आगळ्या पद्धतीने केला साजरा…

⚡बांदा ता.१३-: येथील प्रेरणा महिला मंडळाच्या सर्व महिलांनी यावर्षीचा महिला दिन एका आगळ्या पद्धतीने साजरा केला. रोणापाल येथील सुरू असलेल्या दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंची भेट व रोख रक्कम देऊन हा महिला दिन साजरा केला.स्वामी दयानंद सरस्वती यांच्या प्रेरणेतूनअखिल भारतीय सेवा अभियान चेन्नई या संस्थेने समाजातील गरीब गरजू मुलांसाठी अनेक छात्रालये भारतामध्ये सुरू केलेली आहे….

Read More

विस्तारित वर्ग खोल्यांचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते संपन्न…

⚡बांदा ता.१३-: येथील गोगटे-वाळके महाविद्यालयात भौतिक सुविधातंर्गत खासदार संजय राऊत यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विस्तारित वर्ग खोल्यांचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाचे चेअरमन डी. बी. वारंग, शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक बाळा गावडे, संस्थेचे सचिव एस. आर. सावंत, खजिनदार तुकाराम शेटकर, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर,…

Read More

बांद्यात १५ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.१३-: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा व रोटरी क्लब ऑफ बांदा तसेच सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १५ मार्च रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ याठिकाणी ठीक १०.३० वाजता हे शिबीर सुरू होईल. यावेळी बांबूळी येथील ब्लड बँक रक्तसंकलन करणार आहे.तरी जास्तीत जास्त…

Read More

बिळवस सरपंच मानसी पालव यांच्या कार्याचा कुणकेश्वर यात्रा उत्सवात सन्मान….

⚡देवगड ता.१३-: बिळवस गावच्या उपक्रमशील सरपंच सौ मानसी पालव यांचा नुकताच कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर यात्रे निमित्त येथील ट्रस्टच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या वतीने बिळवस सरपंच सौ मानसी पालव यांच्या आज वरच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे, उद्योजक एकनाथ तेली आंबा बागायतदार अजय…

Read More

स्मार्ट ग्राम स्पधेत पडेलचा तालुक्यात प्रथम क्रमांक…

⚡देवगड ता.१३-: पडेल गाव स्मार्ट ग्राम तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे .पडेल गावाने स्मार्ट ग्राम होण्यासाठी अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबवत आहेत .पडेल सरपंच भुषण पोकळे यांनी गावाला अनेक पुरस्कार मिळावे यासाठी गावात लोकसहभाग मिळवत नाविन्यपुर्ण उपक्रम राबवत आहेत त्याचाच भाग म्हणून या गावाने स्मार्ट ग्राम स्पधेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे. नुकतेच पंचायत समिती…

Read More
You cannot copy content of this page