खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग जिल्हातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर…

श्री. अरुण कुंभार व सौ. वीणा गोसावी पुरस्काराचे मानकरी..

⚡मालवण ता.०२-:
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आदर्श शिक्षक व शिक्षिका पुरस्कार शिक्षक दिनाचे औचित्य साधत जाहीर करण्यात आले असून
यावर्षीचा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. सरोज परब पुरस्कृत आदर्श शिक्षक पुरस्कार सावंतवाडी येथील मिलाग्रीस प्रायमरी स्कूलचे ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक श्री. अरुण महादेव कुंभार यांना तर कसाल येथील श्रीमती विनया कसालकर पुरस्कृत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मालवण येथील एम. एम. परुळेकर प्राथमिक (टोपीवाला प्राथमिक शाळा) शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ. वीणा संदीप गोसावी यांना जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने गेली पंधरा वर्षे हे पुरस्कार देण्यात येत असून सन्मानपत्र, गौरवचिन्ह, महावस्त्र, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संघटनेच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार विजेत्यांचे संघटनेचे अध्यक्ष श्री. गणपत चौकेकर व सचिव राजन नार्वेकर यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page