Headlines

Global Maharashtra Breaking News

रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीच्या अध्यक्षपदी मनस्वी महेश घारे यांची निवड…

⚡देवगड ता.२९-: रोटरी क्लब ऑफ मॅंगो सिटी देवगडची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे,यामध्ये अध्यक्ष पदी माजी जिल्हा परिषद सदस्य मनस्वी महेश घारे यांची निवड करण्यातआली आहे. सचिव पदी गौरव पारकर तसेच खजिनदारपदी अनुश्री पारकर यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ मॅगोसिटी देवगडची बोर्ड ऑफ डायरेक्टरची सभा व जॉईन्ड अर्सेम्ब्ली हॉटेल डायमंड येथे घेण्यात…

Read More

तरुणांनी केली श्रमदानातून नाटळ रस्त्याची डागडुजी…

मागील अनेक दिवस बस सेवा देखील बंद ; सुरू होण्याच्या प्रतीक्षेत.. ⚡कणकवली ता.२९-: तालुक्यातील नाटळ यर्थे नाटळ फाटा ते थोरले मोहुळ या ग्रामीण रस्त्यावरील पावसाळ्यात वाढलेली झाडी व रस्त्याची येथील तरुणांनी श्रमदानाच्या माध्यमातून साफसफारई व डागडुजी करत संबंधीत खात्यास जाग आणली आहे. मागील काही दिवसांपासून नाटळ गावातील थोरले मोहुळ व धाकटे मोहुळ या विभागात येणारी…

Read More

कणकवलीत वाऱ्यासह मुसळधार पाऊस…

⚡कणकवली ता.२९-: कालपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पाऊस हा किरकोळ प्रमाणात कोसळत होता. मात्र आज सकाळपासूनच कणकवलीत मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून, वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे शेतकरी वर्गाने शेतीच्या कामांना सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळते. मात्र हा पाऊस असाच धो – धो कोसळत राहिला तर शेतीचे देखील नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी…

Read More

विहिरीत पडलेल्या कुत्र्याला रवि जाधव यांनी दिले जिवदान…

⚡सावंतवाडी ता.२९-: मनुष्यापासून प्राण्यापर्यंत सर्वांसाठी देवदूत ठरणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांच्यामुळे आज विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे प्राण वाचले .दुपारपासून हा कुत्रा महादेव वाटले कवठणकर यांच्या घरासमोरील विहिरीत पडला होता. याबाबतची माहिती सिताराम गावडे यांनी रवी जाधव यांना देताच त्यांनी घटनास्थळी येत विहिरीत उतरून कुत्र्याला बाहेर काढून जीवदान दिले. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अनेक जणांचे आधारवड बनलेले…

Read More

मुख्यमंत्री ‘ माझी लाडकी बहीण” योजनेची सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमलबजावणी करणार…

संजना सावंत: कोकणातील कातळ शिल्पाच्या संवर्धनासाठी युनेस्कोकडे पाठपुरावा कार्यासाठी प्रयत्न करणार.. ⚡कणकवली ता.२९-: विधानसभा अधिवेशन चालू असून राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. येणारी विधानसभा निवडणूक पाहता यावर्षीच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण या सोबतच शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्याचं दिसून येते. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर…

Read More

पोलीस अधीक्षकांनी केला कणकवलीतील पंधरा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव…

⚡कणकवली ता.२९-: मे २०२४ मध्ये विविध गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील ३४ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी प्रशंसापत्र प्रदान करून जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये कणकवली पोलीस ठाण्याच्या एकूण पंधरा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समशेर तडवी, महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली वरगे, पोलिस…

Read More

आ. वैभव नाईक मला घाबरले असे मी म्हणणार नाही ; पण ती भीती ते कृतीतून दाखवत आहेत…

माजी खा. निलेश राणेंचा आ. वैभव नाईक यांना फेसबुक पोस्टमधून टोला.. ⚡कणकवली ता.२९-: माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये आमदार वैभव नाईक यांना टोला लगावला आहे. त्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, मला विधानसभेची तिकीट मिळणार की नाही ? याचं टेन्शन वैभव नाईक यांना जास्त आलेलं दिसत आहे. रोज उठून माझा सोशल…

Read More

साने गुरुजी कथामाला मालवणच्या कथाकथन स्पर्धेचे विषय जाहीर…

⚡मालवण ता.२८-: साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे यांच्यातर्फे मालवण तालुक्यात प्रतिवर्षी शाळास्तर, केंद्रस्तर, आणि तालुकास्तर भव्य कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेची अंतिम कथाकथन स्पर्धा दि. २० नोव्हेंबर रोजी प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी, आचरे येथे होणार असून या स्पर्धेचे विषय जाहीर करण्यात आले. मालवण तालुका कथामालेची सभा नुकतीच उपाध्यक्ष सुरेंद्र…

Read More

शिक्षक भरती मध्ये डी.एड. बेरोजगारांना सामावून घ्या…

मंगेश तळवणेकर: खासदार राणे व मंत्री केसरकर यांचे वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२८-: जिल्ह्यात कुठलीही मोठी कंपनी नाही किंवा मोठे उद्योगधंदेही नाहीत. त्यामुळे ४०० व सेवानिवृत्त होणारे शिक्षक असे मिळून सुमारे ६०० च्यावर स्थानिक डी.एड. उमेदवारांना भरतीमध्ये शिक्षकपदी नियुक्ती द्यावी अशी मागणी खासदार नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. निवेदनात मंगेश…

Read More

उपरकर समर्थक घेणार चार जुलै रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट…

विविध समस्यांबाबत वेधणार लक्ष: तोडगा न निघाल्यास 15 जुलै रोजी आंदोलन छेडणार.. ⚡सावंतवाडी ता.२८-: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे विविध मागण्यांसाठी माजी आमदार उपरकर यांच्या नेतृत्वाखाली चार रोजी विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. त्यात जर तोडगा न निघाल्यास १५ जुलै रोजी आंदोलन छेडणार येणार आहे, असा इशारा उपरकर समर्थक यांनी सिंधुदुर्ग उप प्रादेशिक…

Read More
You cannot copy content of this page